भाजपचा उन्माद उतरविण्यासाठी कॉग्रेसकडून पक्ष बांधणी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जून 2019

नाशिक ः देशात आणि राज्यात सत्ताधारी भाजपला उन्मादामुळे सर्वसामान्य जनता अस्वस्थ आहे. सामान्य जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आगामी विधानसभा निवडणूकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यानी संघटनात्मक बांधणीला लागण्याचा निर्णय घेतला. 

   कॉग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे ज्येष्ठ नेते माजी आमदार जयप्रकाश छाजेड आदीसह कॉग्रेस पक्षाच्या विविध सेलच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला वीस ते पंचवीस पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाध्यक्ष शेवाळे यांनी, कॉग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी कॉग्रेस पक्षाच्या विविध सेलच्या पुर्नउभारणीचे आवाहान केले.

मागासवर्गीय सेल, आदिवासी, महिला, शेतकरी, पर्यावरण अशा विविध विभागाची पुर्नबांधणी करावी. त्यांच्या कार्यकारीणीच्या जाहीर कराव्यात. त्यानंतर भागाभागात बैठका घेउन पून्हा एकदा पक्षाची बांधणी सुरु करावी. समाजातील विविध घटकांपर्यत पोहोचून त्यांच्या अडचणी समजावून घेत, कॉग्रेस पक्षाच्या बांधणीसाठी सगळ्यांनी एकोप्याने कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news congress meeting