नाशिक जिल्ह्यात मका खरेदीचा प्रश्‍न कायम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 मार्च 2018

नाशिक - शासनाने आधारभूत किमतीत मकाखरेदी अचानक बंद केल्याने 31 डिसेंबरअखेर नोंदणी केलेल्या दीड हजारावर शेतकऱ्यांकडे सुमारे एक लाख क्विंटल मका पडून आहे. त्यामुळे पुरवठा विभागाने मका खरेदीबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागवले आहे.

गेल्या वर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने मक्‍याच्या उत्पादनात पाचपट वाढ झाली. व्यापाऱ्यांनी भाव पाडल्यामुळे राज्य सरकारने आधारभूत किमतीत मका खरेदी करण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी पणन मंडळामार्फत खरेदी केंद्रे सुरू करण्यास परवानगी दिली.

नाशिक जिल्ह्यात दहा खरेदी केंद्रे सुरू केली. त्याद्वारे जिल्ह्यात एक हजार 936 शेतकऱ्यांकडून 96 हजार क्विंटल मका खरेदी झाला. 31 डिसेंबरपर्यंत नोंदणी केलेल्याच शेतकऱ्यांचा मकाखरेदीचा निर्णय घेतला. मात्र, दोन आठवड्यांपासून मका खरेदी अचानक बंद करण्यात आली आहे.

Web Title: marathi news corn purchasing issue