धुळ्यात डॉक्‍टरसह विदेशातून आलेल्या चौघांची तपासणी; कोरोनासदृश लक्षणे नाही 

corona
corona

धुळे : कोरोना व्हायरसची लागण होऊ नये, म्हणून विदेशासह अन्य जिल्ह्यातून येणाऱ्यांची येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्वोपचार रूग्णालयात तपासणी करण्यात येत आहे. आजही पाच जणांची तपासणी करण्यात आली असून एकुण 32 जणांची तपासणी झाली. 


श्री भाऊसाहेब हिरे महाविद्यालयात आज पाच जण आले, त्यात दुबई परतलेले दोन, लंडन व ओमान येथील प्रत्येकी एक तर पुणे येथून आलेल्या एकाचा समावेश होता. पाचही जणांची महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने तपासणी केली. सध्या तरी ते नॉर्मल आहेत. त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईनचा सल्ला दिला. पाच पैकी चौघे धुळे शहरातील अन्य एक धुळे तालुक्‍यातील रहिवासी आहे. या कालावधीत काही त्रास किंवा लक्षणे उदभवल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून घेण्याचे आवाहन केले. आजचे पाच व यापुर्वीच 27 असे एकुण 32 जणांची तपासणी महाविद्यालयात केली. त्यातील आठ जणांच्या शरीरातील नुमने घेऊन ते पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. काल त्यातील तीन नमुने पाठविले असून त्यातील वृध्दासह अन्य असे दोन अहवाल निगेटीव्ह असून रूग्णांची प्रकृतीही नॉर्मल आहे. तर एक अहवालाची तपासणी प्रक्रीया सुरू असून तो प्रलंबित आहे. तो अहवालही लवकरच प्राप्त होईल. 

थंडी- तापाच्या रूग्णांसाठी कक्ष 
कोरोनाच्या प्रमुख लक्षणांमध्ये सर्दी, खोकला ताप ही साधारण लक्षणे आहेत, अशा रूग्णांसाठी श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बाह्य रूग्ण विभागात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला. रूग्णांची सोय आणि प्रादुर्भाव असल्यास तो अन्य रूग्णांना होऊ नये, रूग्णांना तत्काळ उपचार उपलब्ध व्हावेत, यासाठी कक्ष असुन तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूकही करण्यात आली आहे. अधीष्ठाता डॉ. एन. एन. रामराजे, सर्वोपचार रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. राजकुमार सुर्यवंशी यांच्यासह वरीष्ठ अधिकाऱ्यांनी कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे असंख्य रूग्णांना त्याचा लाभ होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com