महामोर्चासाठी नगरसेवकांची पदरमोड 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

नाशिक : सरकार विरोधात महामोर्चे निघतं असताना भाजपच्या महामेळाव्याचे निमित्त साधून संघटीत शक्ती दाखविण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नाशिक मधून बाराशे गाड्यांमधून वीस हजार कार्यकर्ते आणण्याचे आवाहन केले असले तरी यावरून भाजप मध्ये सुंदोपसुंदी वाढली आहे.

एक तर गेल्या वर्षभरात हवे तशी कामे झाली नाही व सत्ता असूनही महत्वाची पदे न मिळाल्याची खदखद व्यक्त करतं एका गाडीसाठी लागणारा लाख रुपयांचा खर्च आणायचा कोठून असा सवाल करतं आमदारांनीचं खर्च का करू नये असा सवाल विचारला जात आहे. 

दोन आठवड्यांपुर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितित भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक झाली त्यात पक्षाची ताकद दाखविण्यासाठी सहा एप्रिलला कार्यकर्त्यांसह मुंबईत हजर राहण्याचे आदेश काढण्यात आले. कार्यकर्त्यांची ताकद दाखविण्यासाठी प्रत्येक नगरसेवकांना दोन बसचे नियोजन करणे सक्तीचे करण्यात आले.

 नगरसेवकांना हा खर्च परवडतं नसल्याने यावरून भाजप मध्ये खदखद वाढीस लागली आहे. एका बस साठी दिवसाला पंचवीस हजार रुपये मोजावे लागतील. बस मध्ये प्रवास करणाऱ्या कार्यकर्त्यांपासून किमान अंतर राखले तरी नाश्‍ता, जेवण व पाण्याची सोय करायची म्हटल्यास एका गाडीचा खर्च पन्नास हजार रुपयांच्या वर जाणार आहे.

दोन बसेससाठी किमान एक लाख रुपये खर्च अपेक्षित धरला तरी हा खर्च करायचा कोठून असा थेट सवाल वरिष्ठांना विचारला जात आहे. सत्ता आल्यानंतर अपेक्षित कामे होतील अशी अपेक्षा होती परंतू आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या गरज, व्यवहार्यता व निधीची उपलब्धता या त्रिसुत्री मुळे कामांना कात्री लागली व पुढील वर्षात देखील कामे होतील कि नाही याची शाश्‍वती नाही त्यामुळे पक्षाकडून आलेला फतवा कसा पाळावा अशी विचारणा होत आहे. यापुर्वी निर्मलवारीसाठी नगरसेवकांनी दहा हजार रुपये मानधन दिले. महापालिकेकडून मिळणारे मासिक वेतन पक्ष निधी म्हणून वळते करून घेतले जात असल्याने पदरमोड करून शक्ती प्रदर्शन केल्याने कोणाचे भले होणार असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. 

सानप पॅटर्न का नको? 
मुंबई पासून नाशिक व पुण्याचे अंतर नजिक असल्याने सर्वाधिक कार्यकर्ते या दोन शहरांतून अपेक्षित आहे. वाहनांचा खर्च प्रत्येकाच्या अंगावर टाकण्यापेक्षा शहराध्यक्ष व आमदारांकडे देण्याच्या सुचना प्रदेश पातळीवरून असतानाही नगरसेवकांच्या माथी तो आर्थिक भार मारला जात आहे. शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी पुर्व मतदारसंघात स्वखर्चाने पंचवीस बसेसची व्यवस्था केल्याने तोच पॅटर्न शहरात राबविण्याची मागणी नगरसेवकांकडून होत आहे. 
 
Web Title: marathi news corporater issue