भाजपला नगरसेवक फुटण्याची भिती, नगरसेवक उद्या सहलीला रवाना

residentional photo
residentional photo

नाशिक- महापालिकेत भाजपकडे बहुमत असले तरी राज्यात महाशिवआघाडीचा नवा पॉलिटीकल पॅटर्न सुरु झाल्याने व नाशिक मध्ये भाजपचे काही नगरसेवक शिवसेनेत प्रवेशकर्ते झालेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे खंदे समर्थक असल्याच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी (ता. 16) सर्व नगरसेवकांना गिरीष महाजन यांनी सहलीला रवाना करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार रामायण वरून उद्या नगरसेवक सहलीला रवाना होती. विशेष म्हणजे सर्व नगरसेवकांना एकत्रित सहलीला रवाना करण्याची जबाबदारी आमदारांवर सोपविण्यात आली आहे. 

   महापालिकेत भाजपला बहुमत असले तरी बदलत्या राजकीय स्थिती मुळे वातावरण पुर्णता बदलल्याची भिती भाजपला वाटतं आहे. राज्यात भाजपला सत्तेपासून दुर सारतं शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची महाआघाडी झाली आहे. तोच पॅटर्न नाशिक महापालिकेत राबविला जावू शकतो त्यात मनसेची भर पडणार आहे. विरोधकांचे बहुमत संकलित केल्यास 52 पर्यंत नगरसेवकांचा आकडा पोहोचतो बहुमतासाठी दहा नगरसेवक लागतील ती कसरं माजी आमदार सानप यांच्या समर्थक नगरसेवकांकरवी भरून काढला जाण्याची भिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आहे.

बहुमत असूनही राज्यात चौथ्या क्रमांकावर असलेल्या मोठ्या महापालिकेची सत्ता हातून गेल्यास पक्षाचे मोठे नुकसान होण्याच्या भितीने आज पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटायला गेलेल्या इच्छुकांना आधी सहलीला नगरसेवकांना बाहेर काढण्याच्या सुचना देण्यात आल्या. आमदार सिमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे व ऍड. राहुल ढिकले या तीनही आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील नगरसेवकांना आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. 

विरोधकांचेही प्रयत्न 
बहुमत असले तरी महापालिकेत सत्तांतर होण्याच्या भाजप नेत्यांच्या भितीमुळे पालिकेतील शिवसेना व अन्य विरोधी पक्षांनी राज्यातील महाशिव आघाडीचा पॅटर्न लागु करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. विरोधकांचे नगरसेवक व माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या समर्थक नगरसेवकांची साथ या आधारे सत्ता स्थापनेसाठी दिवसभर गुफ्तगु सुरु असल्याचे समजते. सत्ता स्थापन करताना महापौर, उपमहापौर तसेच अन्य महत्वाची पदे कोणाला द्यायची यावर मंथन सुरु असल्याचे बोलले जात आहे. 

22 ला निवडणुक 
शहराच्या सतराव्या महापौर व उपमहापौर पदासाठी येत्या 22 नोव्हेंबरला सकाळी अकरा वाजता निवडणुक होणार आहे. जिल्हाधिकारी सुरजं मांढरे निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील. 19 पर्यंत अर्ज विक्री तर वीस नोव्हेंबर पासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रीया राहणार आहे. 

महासभा तहकुब 
विद्यमान महापौर रंजना भानसी यांनी येत्या 19 नोव्हेंबरला महासभा बोलाविली होती. परंतू गिरीष महाजन यांच्या सुचनेवरून महासभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपचे नगरसेवक सहलीला रवाना होणार आहे. विरोधकांना भाजप नगरसेवकांशी संपर्क करण्याची संधी मिळू नये यासाठी सभा तहकुबीच्या सुचना देण्यात आल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com