भाजपचा सत्ता स्थापनेचा विश्‍वास बळावला...नगरसेवक कोकणातून गोव्याकडे

residentional photo
residentional photo

नाशिक : राज्यातील महाशिवआघाडीचा ट्रेलर नाशिक मध्ये निर्माण होण्याच्या शक्‍यतेने बाहेरगावी नगरसेवकांना नेताना भाजपला पुन्हा सत्तेचे गणित जुळविण्यात काही प्रमाणात यश आले आहे. अद्यापही सात नगरसेवक संपर्क क्षेत्राच्या बाहेर असले तरी आता भाजपला सत्ता स्थापनेत कुठलाचं अडसर निर्माण होणार नसल्याचा विश्‍वास निर्माण झाला आहे. एकीकडे भाजपच्या नगरसेवकांकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले असले तरी दुसरीकडे भाजपने देखील जशासतसे उत्तर देण्याचा भाग म्हणून स्थानिक नेत्यांच्या मध्यस्थीने काही नगरसेवक गळाला लावल्याचे बोलले जात आहे. 

भाजपने बहुमत सिध्द करण्यासाठी लावली फिल्डींग

महापालिकेत भाजपकडे बहुमत असले तरी पक्षाचे तेरा नगरसेवक महाशिवआघाडीला मिळाल्याची चर्चा सुरु झाल्यानंतर भाजप नेत्यांमध्ये भिती निर्माण झाली. त्यापार्श्‍वभूमीवर शनिवारी नगरसेवकांना सहलीला धाडण्यात आले. पहिला मुक्काम पुण्यात दुसरा मुक्काम देवगढ येथे झाला. त्यावेळी 41 नगरसेवक सोबतं होते. महत्वाचे नगरसेवक व पदाधिकारी नाशिक मध्ये असले तरी पहिल्या दिवशी तेरा नगरसेवक संपर्क कक्षाच्या बाहेर होते. रविवार पर्यंत भाजपच्या गोटात धाकधुक होती. परंतु तेरा पैकी सहा नगरसेवक कॅम्प मध्ये दाखल झाले. सात नगरसेवकांशी अद्यापही संपर्क होत नसला तरी भाजपने बहुमत सिध्द करण्यासाठी फिल्डींग लावली आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा विश्‍वास वाढला आहे. 

नगरसेवकांचे रुसवे-फुगवे 
कोकणात सहलीला जाताना नगरसेवकांच्या रुसव्या-फुगव्यांचा अनुभव पक्षश्रे÷ष्ठींना पाहायला मिळाला. साध्या बस मधील प्रवास सहन न झाल्याने काही नगरसेवकांनी खासगी गाडीने निश्‍चितस्थळी पोहोचण्याचा आग्रह धरला परंतू मर्सिडीज बेन्झ बसची व्यवस्था झाल्यानंतर राग शांत झाला. रात्री उशिरा देवगढ येथे पोहोचल्यानंतर तेथे हॉटेल डायमंड व वेदांत येथे नगरसेवक व कुटूंबाची व्यवस्था करण्यात आली परंतू त्यापुर्वीचं काही नगरसेवकांनी त्यांच्या मिंत्रासह रुमचा ताबा घेतल्याने अनेक महिला नगरसेवकांना रुम न मिळाल्याने संताप व्यक्त करण्यात आला. रुम न मिळालेल्या नगरसेवकांनी बॅगा उचलल्यानंतर काही नगरसेवकांनी मध्यस्ती करतं हॉटेल मध्ये कुटूंबासाठी रुम उपलब्ध करून दिल्यानंतर मध्यरात्री सुरु असलेला वाद मिटला. 

भाजप नगरसेवक गोव्याकडे 
देवगढ येथील हॉटेल डायमंड व वेदांत मध्ये सोमवारी पहाटे भाजप नगरसेवकांची बस पोहोचली. आमदार नितीश राणे यांनी नगरसेवकांशी संवाद साधला. दुपारी भाजप नगरसेवकांची एक मिटींग झाली. दिवसभर येथील पाहुणचार घेतल्यांतर संध्याकाळी सहा वाजता भाजप नगरसेवकांचा मुक्काम गोव्याकडे हलला. मंगळवारी गिरीष महाजन मुंबईतून गोव्यात दाखल होतील. नगरसेवकांची बैठक घेतल्यानंतर बुधवार पर्यंत महापौर व उपमहापौर पदाचा उमेदवार जाहीर करतील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com