"बबिता'च्या डोहाळे जेवणासाठी मांड्याचा बेत, दत्तक गाईच्या उत्सवात फुगड्यांची अन्‌ पंगतीची रंगत 

live
live

नाशिक ः बबिता..."तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम नव्हे बरं. ही आहे, नाशिकची बबिता. स्वभावानं शांत, कुणाबरोबरही पटकन मैत्री करणारी. तिच्या डोहाळे जेवणासाठी मांड्याचा बेत अन्‌ उत्सवात रंगल्या फुगड्या, भोजनाच्या पगंती झाल्यात. पंचवटीतील बळी मंदिर परिसरातील या अनोख्या कौटुंबिक सोहळ्याची माहिती शहरभर पसरली. 

नाट्य संस्था, शाळा-महाविद्यालयांमधील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वेशभूषा भाड्याने मिळणारे हमखास ठिकाण म्हणजे, जरीवाले दुकान. त्याचे संचालक संजय जरीवाले यांनी गंगापूर येथील बालाजी मंदिराच्या गो-शाळेतून देशी गाईचे वासरु दत्तक घेतले. शेतात आणल्यावर तिचे नामकरण केले "बबिता'. संजय आणि तिची घट्ट मैत्री झाली.

खाण्या-पिण्याबरोबर तिच्या वाढीवर बारकाईने ते लक्ष ठेवून असतात. बबिता तीन वर्षांची झालीयं. गाईविषयी नागरी जीवनात आपुलकी निर्माण व्हावी म्हणून तिचे पालन पोषण करावे हा संदेश देण्यासाठी त्यांनी बबिताच्या डोहाळे जेवणाचा भन्नाट सोहळा साजरा केला. 

दिडशे जणांची पंगत 
"बबिता'ला पट्टा, बाजूबंद, मुकुट आणि हार घालून सजवले. परिसरातील महिला आवर्जून उपस्थित राह्यल्या. त्यांनी तिची पूजा-आरती केली. गाणी देखील म्हटली. फुगड्या खेळल्या. आपल्या सखीला त्यांनी घास भरवला. डोहाळे जेवणात पुरण-पोळीचे मांडे, आमरस, आमटी, गरमागरम भजी होती. परिसरातील शेतकरी, शेतमजूरांना भोजनासाठी आमंत्रित केले. दीडशे जणांच्या पंगती उठवण्यात आल्यात. भोजनावेळी आलेल्यांचा सत्कार-सन्मान करण्यात आला. मुक्‍या प्राण्यांना प्रेम दिल्याने ते आपल्यावर प्रेम करतात, याचा कृतीशील अनुभव सोहळ्यात सहभागी झालेल्यांनी घेतला. 

""मुक्‍या प्राण्यांना प्रेम दिले की ते आपल्यावर अधिक प्रेम करतात. गोसेवा ही पुण्यसेवा आहे. दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना जनावरे सांभाळणे कठीण झाले आहे. चारा-पाण्याचे हाल होताहेत. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत मिळावी याकडे गाईच्या डोहाळे जेवणाच्या सोहळ्यातून लक्ष वेधण्याचा मी प्रयत्न केला आहे.'' 
- संजय जरीवाले (नाशिक) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com