बनावट नोटाप्रकरणी एका 7 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा 

live
live

नाशिक : कारमधून तब्बल 9 लाख रुपयांच्या बनावट नोटाप्रकरणातील आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने 7 वर्षे सक्तमजुरी व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रमोद राधाकिसन ठाकरे असे आरोपीचे नाव असून 20 नोव्हेंबर 2008 रोजी आरोपीला गंगापूर पोलिसांनी अटक केली होती. 

गंगापूर पोलिसांनी बनावट नोटांची खबर मिळाली असता, डिसुझा कॉलनीतील आदित्य सोसायटीतील गाळा क्रमांक 2 मध्ये असलेल्या मोबाईल वर्ल्ड या दुकानावर पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला होता. त्यावेळी दुकानाच्या झडतीतून बनावट नोटा बनविण्याचे साहित्य जप्त केले तर, आरोपी प्रमोद राधाकिसन ठाकरे याच्या मारुती झेन या कारमधून 9 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. दरम्यान दुकानाचा मालक संजय वर्मा, सुधाकर पांडे हे फरार झाले होते. याप्रकरणी प्रमोद ठाकरे यास अटक करून त्याच्याविरोधात तत्कालिन वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांनी तपास करीत दोषारोप पत्र सादर केले होते. 

याप्रकरणाचा खटला अतिरिक्त सत्र न्यायधीश श्रीमती एस.एस. नायर यांच्यासमोर चालला. सरकारी पक्षातर्फे ऍड. पंकज चंद्रकोर यांनी कामकाज पाहताना 8 साक्षीदार तपासले. यात सिक्‍युरिटी प्रेसच्या अधिकाऱ्यांच्या पुराव्यातून जप्त करण्यात आलेल्या नोटा बनावट असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे खटल्यात आरोपी प्रमोद ठाकरे दोषी असल्याचे सिद्ध होऊन त्यास न्यायधीश श्रीमती नायर यांनी 7 वर्षे सक्तमजुरी व 25 हजार रुपयांचा दंड; दंड न भरल्यास 1 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com