विवस्त्र मृतदेह रस्त्यावर फेकला

राजेंद्र अंकार 
मंगळवार, 23 जानेवारी 2018

सिन्नर - सिन्नर शिर्डी रस्त्यावरील खोपडी गावाच्या शिवारात सकाळी साडेचारच्या सुमारास चालत्या वाहनातून विवस्त्र अवस्थेतील अज्ञात पुरुष व्यक्तीचा मृतदेह फेकून दिल्याची घटना घडली आहे. अंदाजे ४० वय असलेल्या मृतदेहावरुन रस्त्यावरील अनेक वाहने गेल्याने त्या व्यक्तीची ओळख पटणे कठीण आहे. शरीरावर इतरत्र कोणत्याही जखमा आढळून आल्या नाहीत. व्यक्तीच्या शरीरावर एकही वस्त्र नव्हते. त्यामुळे पुरावा नष्ट करण्यासाठीच चालत्या गाडीतून जास्त वाहतूक असलेल्या ठिकाणी हा मृतदेह टाकल्याचा संशय आहे. या घटनेचा पोलिस तपास करीत आहेत.

Web Title: marathi news crime throwing deadbody without clothes on the road

टॅग्स