मुंबई, पुणे, नागपूर आहे सायबर गुन्हेगारांचे टार्गेट 

नरेश हळणोर
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

नाशिक 27 : सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर राज्यातील मुंबई, पुण्यासह नागपूर ही मेट्रोसिटी आहेत. संगणकाची जागा लॅपटॉपने आणि आता स्मार्टफोन-टॅबसारख्या सहज हाती माहिती तंत्रज्ञानाचे जाळे (इंटरनेट) आले. स्मार्टफोनच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर वाढल्याने, अन्‌ त्याचा निष्काळजीपणे वापर करणारे सावज सहज हेरणे सायबर गुन्हेगारांना सोपे झाले.

बॅंकांसह कंपन्यांचा डाटा हॅक करून त्याची डार्कबेसलिंक डाटा क्षेत्रात खरेदी-विक्री करणाऱ्या लगाम घालण्यासाठी "सर्ट महाराष्ट्र' सेलची निर्मिती करण्यात आली. यामाध्यमातून लवकरच डाटा चोरीला आळा घातला जाणे शक्‍य होणार आहे. 

नाशिक 27 : सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर राज्यातील मुंबई, पुण्यासह नागपूर ही मेट्रोसिटी आहेत. संगणकाची जागा लॅपटॉपने आणि आता स्मार्टफोन-टॅबसारख्या सहज हाती माहिती तंत्रज्ञानाचे जाळे (इंटरनेट) आले. स्मार्टफोनच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर वाढल्याने, अन्‌ त्याचा निष्काळजीपणे वापर करणारे सावज सहज हेरणे सायबर गुन्हेगारांना सोपे झाले.

बॅंकांसह कंपन्यांचा डाटा हॅक करून त्याची डार्कबेसलिंक डाटा क्षेत्रात खरेदी-विक्री करणाऱ्या लगाम घालण्यासाठी "सर्ट महाराष्ट्र' सेलची निर्मिती करण्यात आली. यामाध्यमातून लवकरच डाटा चोरीला आळा घातला जाणे शक्‍य होणार आहे. 

सायबर गुन्हेगारीचे मूळ हे "डिव्हाईस' आहे. डेस्कटॉपवरून (संगणक) इंटरनेटचा वापर पूर्वी फारसा नव्हता, अलिकडे तो वाढला असला तरी त्यापेक्षा कितीतरी पटीने इंटरनेटचा वापर स्मार्टफोनने होतो. पाश्‍चात्य देशाच्या तुलनेत "सायबर'विषयक अज्ञान फसवणुकीचे मुख्यकारण आहे. टेक्‍नॉलाजी चुकीची नाही परंतु तिचा वापर चुकीचा होतो. सायबर गुन्हेगारीमध्ये 98 टक्के गुन्हेगार हे भारतीय आहे.

 ते बॅंकांच्या नावाने, नोकरी वा लग्नाचे आमिष वा दामदुप्पटीचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक करतात. तर 2 टक्के गुन्ह्यांत परदेशी गुन्हेगार आहेत. यात कंपन्यांचा डाटा हॅक करणे वा बिटक्वॉईनच्या माध्यमातून फसवणूक करणे. विशेषत: यात नायजेरियन गुन्हेगारांचे मोठे प्रस्थ असल्याचे तपासातून समोर आले आहे. 

आपला डाटा असुरक्षित कसा? 
काही ऍप्स वा लिंक्‍स सायबर गुन्हेगारांशी संबंधित असतात. याच माध्यमातून डाटा हॅक होतो. हॅक डाटा "डार्कबेसलिंक'वरून खरेदी-विक्रीसाठी हजारो सायबर गुन्हेगार एकाचवेळी कनेक्‍ट होतात. ऍप वा लिंक डाऊनलोड करताना माहिती विचारली तर त्याची विश्‍वासार्हता तपासून ती द्यावी. अनोळखी इसमाशी चॅटिंग वा कॉलिंग टाळावे; चॅटिंग वा कॉलिंग सुरू असताना सायबर गुन्हेगाराकडूनच मोबाईलमधील आपल्या संपर्कातील मोबाईलचाही डाटा चोरी होतो. 
 
"सर्ट महाराष्ट्र' सेलची निर्मिती 
बॅंकांमधील खातेदारांचा डाटा वा कंपन्यांच्या एचआरकडील डाटा हॅकचे प्रकार वाढले. अशाप्रकारांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबर सेक्‍युरिटी सेलच्या माध्यमातून "सर्ट महाराष्ट्र' सेल कार्यान्वित केला आहे. याच सेलने पायरसीशी संबंधित 10 संकेतस्थळे बंद केली. तर, डाटाबेसलिंकमध्ये शिरकाव करून येत्या काळात सर्ट महाराष्ट्र सेलच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणुकीवर आळा घालणे शक्‍य होणार आहे. 

नाशिक सायबर सेल सर्वोत्तम 
राज्यातील पोलीस आयुक्तालय व जिल्हा अधीक्षक कार्यालयांमध्ये सायबर सेलची निर्मिती केली आहे. त्याठिकाणी आधुनिक स्वरुपाची सायबर लॅब उभारली आहे. सायबर गुन्हेगारीत राज्यात मुंबई आघाडीवर तर, त्याखालोखाल पुणे शहर-ग्रामीण, नागपूर शहर-ग्रामीणचा समावेश आहे. तर, राज्यातील सर्वोत्तम सायबर लॅब ही नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलीस ठाण्याची आहे. नाशिक सायबर पोलीसात एकही गुन्हा प्रलंबित नाही हेच सर्वोत्तम कामगिरीचे प्रमाण आहे. 

दृष्टिक्षेपात... 
भारताची लोकसंख्या : 1 कोटी 25 लाख 
मोबाईल वापरकर्ते : लोकसंख्येच्या 70 टक्के 
राज्यात ऑनलाईन फसवणूक : 2400 कोटी रुपये (2016-17) 
सायबर इकॉनॉमिक्‍स गुन्हे : 60 टक्के 
महिला/मुलांचे शोषण : 30 टक्के 
भारतीय सायबर गुन्हेगार : 98 टक्के 
परदेशी सायबर गुन्हेगार : 2 टक्‍के 

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जनजागृती हाच सर्वोत्तम पर्याय आहे. सायबर गुन्हेगारीचा समोर चेहरा नाही. मोबाईल वापरकर्त्यांनी काळजी घेतली तर तुमची फसवणूक होऊच शकत नाही. त्यासाठी राज्यभर पोलिसांच्या माध्यमातून जनजागृती सुरू आहे. महिला-मुलांनी मोबाईलचा वापर करताना विशेष दक्षता घ्यावी. 
- बालसिंग राजपूत, पोलीस अधीक्षक, राज्य सायबर सेक्‍युरिटी सेल, मुंबई. 

Web Title: marathi news cyber crime rate incresed