समाजात पोलिसांची प्रतिमा उंचवा- पोलिस महासंचालक पडसलगीकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

नाशिक : आगामी काळात लोकसभेसह राज्याच्या विधानसभा निवडणुका असून, त्या पार्श्‍वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखताना एकही चूक होणार नाही, याकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याच्या सूचना करीत समाजातील पोलिस प्रशासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी कम्युनिटी पोलिसिंग करण्यावर अधिक भर देताना, समन्वयातून सुसंवाद साधावा, असे आवाहन पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी मंगळवारी (ता. 11) आढावा बैठकीत केले. 

पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी मंगळवारी पोलिस आयुक्तालयामध्ये आढाव बैठक घेत मार्गदर्शक सूचना केल्या. या वेळी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपायुक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, लक्ष्मीकांत पाटील, माधुरी कांगणे यांच्यासह सहाय्यक आयुक्त व वरिष्ठ पोलिस निरीक्षक उपस्थित होते. पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी महासंचालक पडसलगीकर यांचे स्वागत केले. 
श्री. पडसलगीकर यांनी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना समाज आणि पोलिस यांच्यातील दरी कमी करीत सुसंवादातून कम्युनिटी पोलिसिंगवर भर द्यावा. समाजाशी पोलिसांचा निकटचा संबंध येतो.

 पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकास सन्मानाची वागणूक दिली गेली पाहिजे. आलेला पीडित असल्याने त्याची समस्या सोडविणे ही आपली जबाबदारी असून, ती प्रामाणिक आणि इमानेइतबारे पार पाडली गेली पाहिजे. त्यासाठी पोलिसांनी सातत्याने प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्यातूनच समाजातील पोलिसांची प्रतिमा उंचावेल, असे सांगत आगामी काळात लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठीचे नियोजन करावे. गुन्हेगारांवर वचक राहावा, यासाठी सातत्याने कारवाया कराव्यात. त्याचप्रमाणे येत्या काळात सोशल मीडियाचा गुन्हेगारांकडून वापर होऊ शकतो. त्या पार्श्‍वभूमीवर सायबर पोलिसिंगच्या माध्यमातून सायबर गुन्हगारीवर अंकुश ठेवण्याचे आवाहन करीत सूचना केल्या. आयुक्त डॉ. सिंगल यांनी शहरातील गुन्हेगारीचा थोडक्‍यात आढावा सादर केला. 

पोलिस महासंचालक पडसलगीकर यांनी मंगळवारी सकाळी त्र्यंबक रोडवरील पोलिस अकादमीतील प्रशिक्षणार्थींसाठी झालेल्या कार्यशाळेत व्याख्यान दिले. त्यानंतर त्यांनी पोलिस आयुक्तालयास भेट देऊन आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते परत अकादमीत गेले आणि तेथून परत मुंबईकडे दुपारच्या सुमारास रवाना झाले
 
Web Title: marathi news datta padsalgikar