दिल्लीतील बोगस कॉल सेंटरचा पदार्फाश, नाशिक सायबर गुन्हे शाखेची कामगिरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

नाशिक ः दिल्लीत कॉलसेंटरमधून ग्राहकांना तुमचे एटीएम बिघडल्याचे घाउक मेसेज पाठवून त्यानंतर मोबाईलवर ओटीपी मागवत बॅक खात्यातून पैसे काढून गंडा घालणाऱ्या दिल्लीतील संशयितांची टोळी पकडण्यात नाशिकच्या सायबर क्राईम शाखेला यश आले आहे. पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांनी ही माहीती दिली. 

नाशिक ः दिल्लीत कॉलसेंटरमधून ग्राहकांना तुमचे एटीएम बिघडल्याचे घाउक मेसेज पाठवून त्यानंतर मोबाईलवर ओटीपी मागवत बॅक खात्यातून पैसे काढून गंडा घालणाऱ्या दिल्लीतील संशयितांची टोळी पकडण्यात नाशिकच्या सायबर क्राईम शाखेला यश आले आहे. पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांनी ही माहीती दिली. 

निशांतकुमार ओमप्रकाश सिंग (वय 23), सहारा विक्रम, सुखलाल गंज(मडियाहू जौनपूर,उत्तरप्रदेश), मेहम्मद रयाझउद्दीन फैजल (वय 22), (सुलतानगंज,महिंद्रु,पटणा बिहार) आणि तरुणकुमार शामसिंग (वय 24) (धर्मावाली गल्ली, मथुरा उत्तरप्रदेश) अशी संशयितांची नावे आहेत. संशयितांकडून नाशिक पोलिसांनी 10 मोबाईल आयडिया, व्होडाफोन आणि एयरटेलचे 81 सिम कार्ड, फिंगर प्रिंट स्कॅनर यासह 10 हजाराची रोकड हस्तगत केली आहे. संशयितांनी नाशिकमधील अनेकांना गंडा घातल्याचे उघड झाले असून अनेक आर्थिक गुन्हे उजेडात येण्याची पोलिसांना आशा आहे. 

नाशिक रोडच्या जय भवानी मार्गावरील नंदु दत्तू भिसे (वय 30) यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरला स्टेट बॅकेतून बोलतो असे सांगून त्यांच्या एटीएम कार्ड खराब झाल्याचे सांगणारा फोन आला होता. फोनवरील व्यक्तीच्या सूचनेनुसार भिसे यांनी माहीती दिली. एटीएम कार्डाचा क्रमांक, त्यामागील सीव्हीसी क्रमांकासह मोबाईलवर आलेला ओटीपी सांगितला. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या बॅकेतील 1 लाख 89 हजार 386 रुपये खात्यातून गायब झाल्याचे भिसे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी नाशिकला सायबर सेलकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार तपास करतांना पोलिसांनी या संशयितांच्या दिल्लीत जाउन मुसक्‍या आवळल्या. पोलिस निरीक्षक देवराज बोरसे, दिपक देसले, संतोष काळे, राहूल जगझाप, मंगेश्‍वर काकुळदे, आदीच्या पथकाने ही कारवाई केली. संशयितांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news delhi police call center