डेंगी, मलेरिया आढळल्यास टायर विक्रेते जबाबदार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जून 2019

नाशिक- पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर शहरात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव निर्माण होण्याची दाट शक्‍यता असली तरी त्याला महापालिका जबाबदार राहणार नाही. त्यासाठी महापालिकेने टायर व पंक्‍चर विक्रेत्यांना जबाबदार धरण्याची तयारी सुरु केली असून शहरात मलेरिया, चिकूनगुनिया, डेंगी रुग्ण आढळल्यास त्या-त्या परिसरातील टायर्स विक्रेते व पंक्‍चर दुकानदारांवर कारवाई करण्याचा ईशारा सार्वजनिक आरोग्य विभागाने दिला आहे. 

पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होतो त्यात आता चिकनगुनिया, डेंगी, मलेरिया या सारख्या आजारांची भर पडली आहे. या आजारांना विविध घटक कारणीभुत ठरतात. त्यात घराच्या छतांवरील निकामी टायर्स, नारळाच्या करवंट्या, भंगार साहित्यात पावसाचे पाणी साचून डासांची पैदास होणे. टायर विक्रेते व पंक्‍चर दुकानांसमोर व्यावसायिकांकडून निकामी टायर्स, ट्यूब ठेवल्या जातात. त्यात पावसाळी पाणी साचते व डासांची पैदास होते. पंक्‍चर काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टब मध्येही पाणी साचून डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे आजार बळावतात ज्या भागात अशा प्रकारच्या आजाराचे रुग्ण आढळतील त्यासाठी त्या परिसरातील टायर्स विक्रेते व पंक्‍चर दुकानदारांना जबाबदार धरले जाणार असून त्यांच्यावर कारवाई केली जाणआर आहे. निकामी टायर्स नष्ट करावे, उघड्यावरील टायर्स ताडपत्रीने आच्छादीत करावे किंवा बंदिस्त करावे, उघड्यावरील पाण्याच्या टब मधील पाणी दर दोन, तीन दिवसांनी बदलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dengi maleria