उपजिल्हाधिकाऱ्यांचा तो चालक अपघात करून होता 21 वर्ष गायब... 

shivaji vitekr
shivaji vitekr

जळगाव : धुळे- पारोळा रस्त्यावर भरधाव मिनी ट्रकने ऑटोरिक्षाला दिलेल्या धडकेत एक ठार, तर तीन गंभीर जखमी झाल्याप्रकरणी तब्बल 21 वर्षे फरार ट्रकचालकाला गुन्हे शाखेने मध्य प्रदेशातील खंडवा येथून अटक केली. 

क्‍लिक करा - शहरात आठ केंद्रावर 26 जानेवारीपासून "शिवभोजन'
धुळे- पारोळा रस्त्यावर भरधाव मिनी ट्रकने (एमपी 12, बी 1586) समोरून येणाऱ्या ऑटोरिक्षाला (एमडब्ल्यूडी 1741) जोरदार धडक दिली. अपघातात ऑटोरिक्षातील शरद भगवान सोनार (वय 22, रा. धुळे) ठार झाला, तर काशिनाथ चौधरी, दीपक देवरे असे तिघे गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर गुन्हा दाखल होऊनही संशयिताला अटक झाली नव्हती. पोलिसांच्या फरार आरोपींमध्ये संशयितांचा समावेश असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम यांनी संशयितांच्या शोधार्थ पोलिस नाईक प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, नरेंद्र वारुळे, विजय पाटील यांचे पथक नियुक्त केले होते. पथकाने संशयित मिनी ट्रकचालक शिवाजी विष्णू विटेकर (वय 50) याचे नांदुरा येथील घर गाठले. तेथे तो गाव सोडून गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याच्या नवीन पत्त्यावर नगर जिल्ह्यातील राहता येथे पोलिस पथक पोचले. त्यांना मध्य प्रदेशात असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यांनी मध्य प्रदेशाकडे धाव घेतली. संशयित शिवाजी विष्णू विटेकर हा नाव बदलून वास्तव्यास असल्याचे आढळून आल्यानंतर, "आम्हाला बदली ड्रायव्हर पाहिजे' असल्याचे सांगत त्याची चौकशी करून पथकाने ताब्यात घेतले. 

उपजिल्हाधिकाऱ्यांचा होता वाहनचालक! 
अटकेतील संशयित शिवाजी विष्णू विटेकर हा मध्य प्रदेशात पूर्वी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनावरील चालक होता. मात्र, त्याची बदली छत्तीसगड येथे झाल्याने तो नोकरी सोडून खासगी वाहन चालवीत होता. तेव्हाच त्याच्या हातून हा अपघात घडला आणि तब्बल 21 वर्षांपासून तो फरार होता. मध्य प्रदेशातील खंडवा येथे तो भाड्याने घर घेऊन नाव बदलून तेथे वास्तव्यास होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com