esakal | फागणे - नवापूर दरम्यानचा १४० किलोमीटर लांबीचा महामार्ग खड्ड्यात 
sakal

बोलून बातमी शोधा

फागणे - नवापूर दरम्यानचा १४० किलोमीटर लांबीचा महामार्ग खड्ड्यात 

महामार्ग प्राधिकरण विभागाने तथा काम दिलेल्या कंपनीने माती, मोठी खडी, टाकून खड्डे बुजविण्याचे केविलवाणे प्रयत्न केले आहेत. काही ठिकाणी खड्डे दोन फूटापर्यंत पडले आहेत.

फागणे - नवापूर दरम्यानचा १४० किलोमीटर लांबीचा महामार्ग खड्ड्यात 

sakal_logo
By
तुषार देवरे

देऊर : नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील फागणे ते नवापूर हद्दीपर्यंत 140 किलोमीटर दरम्यान महामार्गावर खड्डे, धूळीसह आदि समस्या गेल्या काही वर्षापासून सातत्याने त्रासदायक ठरली आहे. महामार्ग
काम दोन वर्षात पूर्ण केले जाणार आहे. मात्र तोपर्यंत महामार्ग दुरूस्तच करायचा नाही का ? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

आवश्य वाचा- गांजाची सीमेपलीकडून रिमोट शेती पोलिसांसाठी आव्हान   

महामार्गावर चोवीस तास वाहनांची वर्दळ सुरु असते. गुजरात, राजस्थान, हैद्राबाद, मध्यप्रदेश आदि राज्यातील मालवाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. मात्र तुलनेत अर्धवट पूलांच्या ठिकाणी कच्चा रस्ता आहे. या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. संबंधित महामार्ग प्राधिकरण विभागाने तथा काम दिलेल्या कंपनीने माती, मोठी खडी, टाकून खड्डे बुजविण्याचे केविलवाणे प्रयत्न केले आहेत. काही ठिकाणी खड्डे दोन फूटापर्यंत पडले आहेत.ज्या ठिकाणी माती टाकली आहे. तेथे धूळीचे साम्राज्य पसरते. अवजड वाहनांमुळे मागे धूळ उडते. मोटरसायकल वाहनधारकाला पुढील रस्ताच दिसत नाही. यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.

दुचाकीस्वारासाठी बिकट वाट 
नेर, कुसुंबा, मोराणे, आनंदखेडे, भदाणे, देऊर आदि गावांतील नागरिकांचे अपघात झाले आहेत. माती टाकून त्याच्यावर पाणी टाकणे आवश्यक आहे. मात्र नावापुरती डागडुजी केली जात आहे. दररोज या महामार्गाने अधिकारी, लोकप्रतिनिधी ये जा करतात. मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. सर्वात जास्त त्रास दुचाकीस्वाराला आहे. धुळीमुळे श्वसनाचा त्रास होत आहे. मातीत घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. 

महामार्गाचे काम कासवगतीने  

या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला कोरोनाचाही फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित काम करणार्या कंपनीने अधिक यंत्रसामुग्री, मनुष्यबळ वाढवून काम गतीने करणे आवश्यक आहे. अपूर्ण प्रलंबित काम सुरू झाले आहे. एवढीच गोष्ट खरी. ईपीसी धर्तीवर काम जलद गतीने व्हावे. ही अपेक्षा आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image