झोपडी ते डिजिटल वर्ग 

कमलेश पटेल
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

रस्ताच नसल्याने पायवाटेनेच सगळं साहित्य वाहून नेत एक खोली तयार होऊन विद्यार्थ्यांना हसत-खेळत शिक्षण मिळत आहे. झोपडीचे डिजिटल वर्ग असा हा प्रवास राजेंद्र गिरी व उमेश कोळपकर या शिक्षक द्वईंनी तारेवरची कसरत करत पूर्ण केला. 

शहादा : आदिवासी दुर्गम भागात जिथे धड वाहनही जाऊ शकत नाही, फक्त पायवाट आहे; अशा कापटीपाडा (ता. धडगाव) येथील ग्रामस्थ व शिक्षकांनी लोकसहभागातून जिल्हा परिषदेच्या शाळेचे रुपडेच पालटवले. वर्ग डिजिटल करुन दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल युगात शिक्षणाचा माध्यमातून चंचुप्रवेश मिळवून दिला. 

डिजिटल वर्गाचे उद्‌घाटन केंद्रप्रमुख नरेंद्र महिरे यांच्या हस्ते झाले. शिक्षण विस्तार अधिकारी योगेश सावळे, माजी गटशिक्षणाधिकारी अनिल दोडे,महेंद्र राजपूत, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किसन वळवी, प्रथम नियुक्त वस्तीशाळा शिक्षक तेजल पटले,माजी मुख्याध्यापक अनुप राठोड उपस्थित होते. 

Image may contain: outdoor

असा झाला बदल 
कापटीपाडा ग्रामपंचायतींतर्गत रुमाजी पटले यांचा घरात 2001 मध्ये झोपडीवजा घरात वस्तीशाळा सुरू करण्यात आली. बुडूमलपाडा व कापडीपाड्यातील 25 ते 30 विद्यार्थी या वस्ती शाळेत शिक्षण घेऊ लागले. 2008 मध्ये वस्ती शाळेचे रूपांतर जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत झाले. 3019 पर्यंत विना भाडेतत्त्वावर शाळा तेथेच भरली. शाळेत जाण्यासाठी दऱ्याखोऱ्यात जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. 

Image may contain: 4 people, people smiling, hat

नक्‍की वाचा > आम्ही पुन्हा- पुन्हा येऊ... 

Image may contain: one or more people and outdoor

झोपडी ते डिजिटल वर्ग 
उपशिक्षक उमेश कोळपकर व मुख्याध्यापक राजेंद्र गिरी बुवा यांनी बदलीपेक्षा बदल करण्यासाठी शाळेची निवड केली अन शाळेवर रुजू झाले. गावातील दानशूर व्यक्ती जुमा पटले यांनी सुमारे अर्धा एकर जमीन शाळेला दानपत्र केली. जमीन मिळाली अन वर्गखोली बांधकामासाठी मिळालेल्या निधीतून काम सुरु झाले. रस्ताच नसल्याने पायवाटेनेच सगळं साहित्य वाहून नेत एक खोली तयार होऊन विद्यार्थ्यांना हसत-खेळत शिक्षण मिळत आहे. झोपडीचे डिजिटल वर्ग असा हा प्रवास राजेंद्र गिरी व उमेश कोळपकर या शिक्षक द्वईंनी तारेवरची कसरत करत पूर्ण केला. 

Image may contain: one or more people

असे का घडले > चक्‍क मुलाने फौजदाराला उभे केले न्यायालयात 

ग्रामपंचायतीचे ही योगदान... 
शाळा डिजिटल करण्यासाठी खामला ग्रामपंचायत अंतर्गत कापटीपाडा येथील वस्तीशाळेचे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत रूपांतर होऊन डिजिटल वर्ग बांधकाम पूर्ण झाल्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर सामान्यज्ञान, राज्य व देश बाहेर सुरु असलेल्या विविध घटनेचे ज्ञान व्हावे याकरीता पेसा अंतर्गत निधीतून 43 इंची एलईडी, बॅटरी भेट देण्यात आली. 

बदलीपेक्षा बदल घडविण्याचा प्रयत्न करण्याचा मानस निश्‍चित करीतच दुर्गम कापटीपाडा येथे जाऊन झोपडीतील वस्ती शाळा डिजिटल वर्ग कार्यान्वित करण्याचा संकल्प केला. तो पूर्ण झालेला आहे. यासाठी मुख्याध्यापक खांबला ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. 
- उमेश कोळकर, उपशिक्षक. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhadgaon digital class room teacher