पोर्टब्लेअर येथे शनिवारपासून ४ थी आदिवासी धर्मकोड परिषद

residentional photo
residentional photo

वणी  :  २०२१ च्या जनगणनेत आदिवासींना धर्म नोंदणीसाठी स्वतंत्र कोड हवा या साठी देश पातळीवर आदिवासी समाज एकत्र येऊन मागणी करत आहे. या उद्देशाने २४ व २५ ऑगस्ट रोजी पोर्टब्लेअर (अंदमान)  येथे राष्ट्रीय स्थरावर दोन दिवशीय '४ थी आदिवासी धर्मकोड परिषद' संपन्न होत असल्याची माहिती आदिवासी बचाव अभियानाचे राज्यअध्यक्ष प्रा. अशोक बागुल यांनी दिली आहे.

अंदमान आणि निकोबार सारणा समिती व राष्ट्रीय आदिवासी इंडिजिनिअस धर्म समन्वय समिती भारत यांच्यातर्फे पोर्टब्लेअर (अंदमान)  येथील नागपूर भवनात राष्ट्रीय स्थरावर दोन दिवशीय परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आले. १८७१ पासून झालेल्या जनगणना मध्ये आदिवासीना जनगणना फॉर्म मध्ये आपला धर्म नोंदण्या साठी 9(नऊ) नंबरचा स्वतंत्र कॉलम देण्यात आला होता. १९४१ पर्यंत अबओरिजिन, अबओरिजिनल,एनिमिस्ट, ट्राईब रिलीजन, ट्राइब्स, आदिवासी धर्म  अशा नावांनी संबोधण्यात आले होते. त्या साठी जनगणना फॉर्म मध्ये स्वतंत्र कॉलम होता. १९५१ च्या जनगणना मध्ये शेड्युल ट्राईब संबोधून स्वतंत्र गणना करणे बंद करण्यात आले.

   १९६१ जनगणने पासून आदिवासींना आपला धर्म लिहिण्या साठी स्वतंत्र कॉलमच नसल्याने कोणी हिंदू कोणी मुस्लिम, ख्रिच्चन असे विविद्ध पर्याय निवडले. त्यामुळे जनगणनेत आदिवासी समुदायाची ओळख नष्ट झाली. त्यामुळे २०११ च्या जनगणने पर्यंत देशात किती आदिवासी राहतात, याची स्वतंत्र नोंदच झाली नाही.

 आगामी २०२१ च्या जनगणनेत सन १९४१ पूर्वी ज्याप्रमाणे आदिवासींना आपला धर्म नोंदण्यासाठी जनगणना फॉर्मवर स्वतंत्र कॉलम ठेवण्यात येत होते व आदिवासींची स्वतंत्र गणना केली जात होती. त्याप्रमाणे पुन्हा जनगणना करण्यात यावी या साठी पोर्टब्लेअर अंदमान येथे राष्ट्रीय स्थरावर दोन दिवसीय  धर्मकोड परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.  या परिषदे साठी नासिक, पुणे ,अहमदनगर धुळे, नंदुरबार ठाणे येथून 150 बांधव उपस्थित राहणार आहे. असी माहिती महाराष्ट्र आदिवासी बचाव अभियानचे अध्यक्ष प्रा.अशोक बागुल यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com