पूर्वचे विभागीय अधिकारी रविंद्र धारणकर निलंबित 

live
live

नाशिक- रमजान ईदच्या दिवशी प्रभाग 23 चे नगरसेवक सतीश कुलकर्णी, चंद्रकांत खोडे, रुपाली निकुळे, शाहीन मिर्झा यांच्यावर अनधिकृत होर्डिंग सारडा सर्कल येथे लावल्याने चौघांविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्याचे पडसाद आज महासभेत उमटले

. चौघा नगरसेवकांनी शहानिशा न करता कारवाई केल्याचा दावा केला,गुन्हा दाखल करताना परवानगी का घेतली नाही असा सवाल करत निलंबन होत नाही तोपर्यंत महासभेत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. भाजप नगरसेवकांच्या मदतीला विरोधी पक्ष धावून आले, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी नगरसेवकांच्या मानसन्मानाचा विषय असल्याने पुर्व विभागाचे विभागीय अधिकारी रवींद्र धारणकर यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी केली. अखेर निलंबन करण्यात आले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com