रुपेकार्ड विमा योजनेतून एक लाखाची मदत 

dharangaon rupay card
dharangaon rupay card

पारोळा : येथील शाखेचे खातेधारक किरण शिवाजी पाटील (रा. कामतवाडी, ता. पारोळा) यांनी शाखेकडून रुपेकार्ड (एटीएम) घेतले होते. मात्र, दुदैवाने त्यांचा १८ जुलै २०१९ ला अपघाती मृत्यु झाला. सदर घटनेबाबत पारोळा शाखेत कळविण्यात आल्याने खातेधारक यांनी रुपेकार्ड एटीएमने व्यवहार केला असल्याने त्यांना न्यु इंडीया इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून वारसास एक लाखाची धनादेश देण्यात आला. 

पारोळा येथील धरणगाव अर्बन बँकेच्या १६व्या वर्धापनाप्रसंगी खातेधारक किरण पाटील यांच्या वारस पत्नी कविता किरण पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते धनादेश देण्यात आला. यावेळी व्हाइस चेअरमन आधार चौधरी, शाखेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराथी, सल्लागार समिती सदस्य सुरेंद्र बोहरा, केशव क्षत्रीय, ॲड. दत्तात्रय महाजन, सुहास येवले, शाखा व्यवस्थापक सचिन दौंड यांच्‍यासह कर्मचारी व ग्राहक उपस्थित होते. 

जिल्ह्यातील तीन शाखांना एटीएम परवानगी 
शाखेच्या ग्राहकांना आय.सी.आय.सी.आय व इतर बँकेतील एटीएममधून पैसे काढावे लागत होते. मात्र, जिल्ह्यातील धरणगाव, पारोळा व जळगाव येथे स्वत:च्या शाखेचे एटीएम असावे यासाठी नुकतीच परवानगी मिळाल्याने ग्राहकांना एटीएमद्वारे पैसे काढणे सोयीचे होणार आहे. 

सर्वच शाखेत युपीआय प्रणाली कार्यान्वीत 
डिजीटल युगात फोन पे, गुगल पे, एअरटेल पे या सुविधा जशा उपलब्ध आहेत. तशीच प्रणाली शाखेच्या प्रत्येक कार्यालयात सुरु करण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना व्यवहार सुलभ व सोयीचे करता येणार आहे. यासाठी धरणगाव अर्बन बँकेचे चेअरमन, संचालक मंडळ व सल्लागार समितीने ग्राहक हितासाठी युपीआय सर्व्हीसच्‍या माध्यमातून व्‍हॉटस्‌ॲपद्वारे ॲप तयार करुन पैसे काढणे- पैसे भरणे या सुविधा सुरु केल्याने ग्राहकास यातून दररोज एक लाख रुपये काढता येणे सोयीचे होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com