भवरखेडे वीज पडून पाच जणांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

जळगाव ः भवरखेडे (ता. धरणगाव) येथे आज दुपारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यात वीज पडून शेतात बाजरी कापण्याचे काम करण्यासाठी गेलेल्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज घडली. मृतांमध्ये एकाच कुटूंबाती चार जण आहे. 

जिल्ह्यात बुधवारपासून (ता.25) परतीच्या पावसाला जोरदार सुरवात झाली आहे. यात आज दुपारी एकच्या सुमारास अमळनेर, धरणगाव परिसरात मुसळधार पावसाला सुरवात झाली. सकाळी पावसाची उघडीप होती शिवाय उन देखील पडले होते. यामुळे शेतात लावलेली बाजरी कापण्याच्या कामासाठी गेले होते. मात्र दुपारी एकच्या सुमारास अचानक वीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरवात झाली. बाजरी कापणारे सारेजण झाडाच्या आडोस्याला उभे राहिले होते. दरम्यान वीज पडल्याने यात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मृतांमधील चार जण एकाच कुटूंबातील सदस्य आहेत. मृतांमध्ये रघुनाथ दशरथ पाटील (वय 67), अलका रघुनाथ पाटील (य 60), कल्पना शामकांत पाटील (वय 35), शोभा भागवत पाटील (वय 50) व लताबाई उदय पाटील (वय 32) यांचा समावेश आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dharngaon vij 5 death