ढिकलेंच्या प्रवेशाकडे भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची पाठ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

नाशिकः एरवी भाजपच्या वसंत-स्मृती कार्यालयात छोटासा कार्यक्रम असला तरी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते झाडून हजर राहतात. मात्र, ऍड. राहुल ढिकले यांच्या प्रवेशावेळी मात्र प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. 

भाजपचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, उपाध्यक्ष वसंत गिते, सुनील बागूल, विजय साने, आमदार सीमा हिरे, महेश हिरे यांची अनुपस्थिती भाजपच्या दुसऱ्या फळीतील युवा पदाधिकाऱ्यांना खटकत होती. आमदार फरांदे व हिरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेनेचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता, परंतु पक्षाच्या कार्यालयात माजी महापौर विनायक पांडे यांनी ऍड. राहुल ढिकले यांची भेट घेतली, तर देवळालीचे माजी आमदार बबनराव घोलप, ऍड. ढिकले यांच्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित होते

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhikle in bjp