residentional photo
residentional photo

"सकाळ' ढोल-ताशा प्रशिक्षणासाठी नोंदणी सुरु, 1 मेपासून शिबीराद्वारे धमाल

    नाशिकः हल्ली मोबाईल गेम्सपासून अन्य विविध माध्यमांत तरुणाई दंग होताना दिसते. त्याचा त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शून्य फायदा होतो. दुसरीकडे शहरातील तरुणाई विविध ढोल- ताशा पथकांमध्ये सहभागी होतांना वादनाचा मनसोक्‍त आनंद घेताना दिसतात. उन्हाळी सुट्यांचा योग्य सदुपयोग व्हावा, यासाठी ढोल-ताशांचे प्रशिक्षण देण्यासाठी सकाळ'तर्फे 1ते31 मेदरम्यान प्रशिक्षण शिबिर होत आहे. या शिबिरासाठी नोंदणीप्रक्रिया सुरू झाली असून, सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

शिबीरात ढोल- ताशा वादनातील तज्ज्ञांकडून उपयुक्‍त अशा टिप्स या शिबिरातून दिल्या जाणार आहेत. तसेच वादनाचा भरपूर सरावदेखील करून घेतला जाणार आहे. ढोल- ताशा वादन शिकू इच्छिणाऱ्यांसाठी शिबिर उपयुक्‍त ठरेल.
   शिबिरासाठी शिवसाम्राज्य ढोल- ताशा पथक सहआयोजक आहेत. व्हेन्यू पार्टनर गोखले एज्युकेशन सोसायटी ही संस्था आहे. 1 ते 31 मे या कालावधीत सायंकाळी सहा ते रात्री आठदरम्यान प्रशिक्षण शिबिर कॉलेज रोडवरील बीवायके महाविद्यालय प्रांगणात होईल. 

महिलांना सहभागाची सुवर्ण संधी
ढोल- ताशातून निखळ मनोरंजन होताना उत्कृष्टरित्या व्यायामदेखील होत असतो. ऐरवी घरकाम व अन्य बाबींमध्ये व्यस्त असणाऱ्या महिलांना वादनाचा आनंद घेताना तंदुरुस्तीचे धडे या शिबिरातून गिरवता येणार आहेत. त्यामुळे महिलांना या शिबिरात सहभागाची सुवर्ण संधी असून, या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. 

नोंदणी करा...
शिबिरात सहभाग नोंदविण्यासाठी नोंदणी करणे आवश्‍यक आहे. त्याकरिता नवीन सीबीएस, ठक्‍कर बझार येथील "सकाळ'च्या शहर कार्यालयात नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रवेश मर्यादित असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असणार आहे. अधिक माहितीसाठी शरद धात्रक (9890011120) आणि कुणाल राजेभोसले (8888888905) यांच्याशी संपर्क साधावा.

तनिष्का, यिन, एनआयईच्या सदस्यांसाठी सवलत
प्रशिक्षणासाठी आवश्‍यक असलेले साहित्य शिबिर ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. महिनाभर चालणाऱ्या या शिबिरात सहभागी होण्यासाठी सातशे रुपये शुल्क आहे. तर "सकाळ- मधुरांगण', तनिष्का, यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन), "एनआयई'च्या सभासदांसाठी सवलतीच्या दरात पाचशे रुपये शुल्कामध्ये नोंदणी सुविधा उपलब्ध असेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com