esakal | `राष्ट्रवादी`त प्रवेशानंतर खडसेंचे धुळे जिल्ह्यात जंगी स्वागत !
sakal

बोलून बातमी शोधा

`राष्ट्रवादी`त प्रवेशानंतर खडसेंचे धुळे जिल्ह्यात जंगी स्वागत !

उत्तर महाराष्ट्रात वीस ते पंचवीस वर्षांपासून रखडलेल्या विकासाच्या विविध प्रकल्पांना गती देण्याचा प्रयत्न असेल. सिंचन प्रकल्पातील पाणी उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पोहोचवि.ण्यासाठी कटिबद्ध असेल. 

`राष्ट्रवादी`त प्रवेशानंतर खडसेंचे धुळे जिल्ह्यात जंगी स्वागत !

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे ः राष्ट्रवादीत आज माझा पहिला दिवस आहे, असे सांगत खडसे यांनी धुळे जिल्हाध्यक्षांशी बोलून जुन्या, नव्या, नाराज कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करून राष्ट्रवादीची मुठ बांधण्याच्या कामाला पहिल्याच दिवसापासून सुरूवात केली आहे. धुळे जिल्ह्यात आज खडसेंचे मुंबईवरून आल्यानंतर जंगी स्वागत करण्यात आले. तसेच यावेळी खडसेंनी भाजप हल्ला करत राष्ट्रवादीत रखडलेले विकास कामे मार्गी लावण्यासाठी आलो असल्याचे देखील सांगितले.


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शुक्रवारी प्रवेशानंतर श्री. खडसे शनिवारी कारने धुळेमार्गे जळगावला रवाना झाले. त्यांचा सायंकाळी साडेसहानंतर पुरमेपाडा (ता. धुळे) सीमेवर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील, सुनील नेरकर, तालुकाध्यक्ष राजेंद्र चितोडकर, माजी जिल्हाध्यक्ष किरण पाटील, महिला जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा व कार्यकर्त्यांच्या हस्ते पहिला सत्कार झाला. नंतर पारोळा चौफुलीवर शहराध्यक्ष रणजीत भोसले, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत काटे, महेंद्र शिरसाट, महिला शहराध्यक्षांसह कार्यकर्त्यांच्या हस्ते सत्कार झाला. स्वागतासह खडसे यांना ठिकठिकाणी शहर व ग्रामीणच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः गराडा घातला होता. नंतर हॉटेल शांतिसागर येथे खडसे यांनी वार्तालाप करत विविध प्रश्‍नांना उत्तरे दिली. 

थोडी वाट बघा सीडी लवकर आणू 
खडसे म्हणाले, की भाषण रंगविण्यासाठी काही बोलावे लागते. त्यामुळे मी `इडी` लावाल, तर आम्ही `सीडी` लावू, असे बोललो. पण सीडी लवकर जनतेसमोर आणून त्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल.  उत्तर महाराष्ट्रात वीस ते पंचवीस वर्षांपासून रखडलेल्या विकासाच्या विविध प्रकल्पांना गती देण्याचा प्रयत्न असेल. सिंचन प्रकल्पातील पाणी उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पोहोचवि.ण्यासाठी कटिबद्ध असेल. 


 १२ माजी आमदार संपर्कात 
राज्यातील भाजपचे १२ ते १३ माजी आमदार माझ्या संपर्कात आहे. त्यांच्याशी बोलणे सुरू असून खासदार डॉ. हिना गावीत, माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनाच मी भाजपमध्ये आणले होते. तसेच शिवसेनेतून खासदार डॉ. सुभाष भामरे यांना भाजपमध्ये आणले होते. त्यात पूर्वी राष्ट्रवादीत असणाऱ्यांना पुन्हा या पक्षात आणण्याचा प्रयत्न असेल. शहाद्याचे (जि. नंदुरबार) नगराध्यक्षच नव्हे तर अनेक नगरसेवक माझ्या संपर्कात आहे. मंत्री छगन भुजबळ, माजी आमदार अनिल गोटे यांच्या साथीने ओबीसी चळवळीला गती देण्याचा, या घटकाला न्याय मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असेल, असेही श्री. खडसे म्हणाले. 


दरेकर यांचे अभिनंदन 
नेते प्रवीण दरेकर यांनी सत्कार स्वीकारण्यापेक्षा खडसे यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांची समस्या जाणावी, अशी टिका केल्याचा प्रश्‍न उपस्थित झाला. त्यावर मला त्यातील काही कळत नाही, पण दरेकर यांची शेतकऱ्यांविषयी तळमळ पाहून, त्यांना शेतीतील अधिक कळत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो, अशी खोचक टिका श्री. खडसे यांनी केल्यावर हशा पिकला. 

संपादन- भूषण श्रीखंडे