esakal | शेतकर्यांनी आवश्यक असेल तेवढाच युरिया वापरा !
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकर्यांनी आवश्यक असेल तेवढाच युरिया वापरा !

सरकारकडून तुम्हाला काय हवे आहे. शेतीशाळा करतांना काय मिळत आहे. असे विविध प्रश्न विचारल्यावर महिला शेतकर्यांनी मंत्री श्री. भुसे यांच्याकडे पुरेशा युरियाची मागणी केली. 

शेतकर्यांनी आवश्यक असेल तेवढाच युरिया वापरा !

sakal_logo
By
तुषार देवरे

देऊर : शेतकर्यांनी आवश्यक असेल तेवढाच युरिया पिकांसाठी वापरा. उपस्थित महिला शेतकर्यांनी गावातील शेतकर्यांना सांगा. सर्व गावात युरिया उपलब्ध करून दिला जाईल. व्यवस्था करू, यासंदर्भात जिल्ह्यात आढावा बैठक घेऊन शेतकर्यांची समस्या सोडविणार आहे. शेतकर्यांच्या समस्या दूर करा. परिसरातील शेतकर्यांना शेतीशी निगडीत कोणतीही अडचण यायला नको. असे कृषीमंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट सूचना दिल्या. 

लोणखेडी (ता.धुळे) येथे क्राॅपसॅप अंतर्गत मका पिकावरच्या महिला शेतीशाळेस आज भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार मंजुळा गावित, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, कासारेचे सरपंच विशाल देसले, कृषी सभापती रामकृष्ण खलाणे, लोणखेडी सरपंच शालिक पाटील, डाॅ.तुळशिराम गावित, नेरचे सरपंच शंकरराव खलाणे, जेष्ठ नागरिक लिलाबाई पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा कृषी अधिकारी पी.एम. सोनवणे, तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे आदि उपस्थित होते. मंत्री श्री.भुसे यांनी महिलांना सांगितले, तुमचा भाऊ येथे उभा आहे. सरकारकडून तुम्हाला काय हवे आहे. शेतीशाळा करतांना काय मिळत आहे. असे विविध प्रश्न विचारल्यावर महिला शेतकर्यांनी मंत्री श्री. भुसे यांच्याकडे पुरेशा युरियाची मागणी केली. मका पिकाला हमी द्या. पीक विम्याची रक्कम अद्याप मिळाली नाही. याबाबत मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले की, हमी भावाची खरेदी केंद्र शासनाकडून होते. पोल्ट्री व्यवसायाला मका वापरला जायचा. दरम्यान कोरोनामुळे पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आला. यामुळे मक्याला फटका बसला. राज्य सरकारने खरेदी केले, तेव्हा व्यापारांनी भाववाढ केली. या पार्श्वभूमीवर सरकार नियोजन करणार आहे. पिकांचे धोकेनुसार विमा संरक्षित रक्कम मिळते. पिकांसाठी किती युरिया वापरला पाहिजे. कसा वापरावा. याचे सर्व शेतकर्यांना कृषी कर्मचारींनी गावात जाऊन द्यावी.

तालुका कृषी अधिकारींना गावातील शेतीची विचारणा केली. पिक विम्याचा आढावा घेतला. दरम्यान शेतीशाळेवर आधारीत महिलांच्या सांघिक खेळातील शेतकरी ममता चव्हाण, शारदा पाटील यांना बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन मंडळाधिकारी अमृत पवार, जनार्दन सोनवणे, कुसुंबा मंडळातील सर्व कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांनी केले.

कृषीमंत्र्यांसमोर वाचला समस्यांचा पाढा 
लोणखेडी (ता.धुळे) येथे कृषीमंत्री दादा भुसे कृषी कार्यक्रमासाठी आले. गावात आगमन होण्यापूर्वी बसस्थानकाशेजारी तलाठी कार्यालया भोवती शेतकर्यांची गर्दी दिसली. कृषीमंत्री दादा भुसेंनी गाडीतून खाली उतरत शेतकर्यांची विचारणा केली. कशाची गर्दी आहे. काय झाले. उपस्थित लोणखेडी, नेर, देऊर परिसरातील शेतकर्यांनी समस्यांचा पाढा वाचला. त्यात लोणखेडी गावासाठी पूर्णवेळ तलाठीची मागणी केली. सातबारा वेळेवर मिळावा. नोंदी महसूल दप्तरी तात्काळ लावा. पीक विम्याची 30तारीख जवळ आली आहे. त्या पार्श्वभूमीवर शासकीय कागदपत्र अपडेट मिळावे. असे विविध प्रश्न शेतकर्यांनी कृषीमंत्री श्री. भुसे यांना केले. 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image