चंद्रकांत पाटलांना "चंपा' हे नाव महाजनांनी ठेवलं; तर फडणवीसांना "टरबुज्या' हे नाव... 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 June 2020

भाजपमधील नेत्यांचे नाव बदलविण्याची संधी त्यांच्याच पक्षातील नेतेच देत नाही. आपापसातील व्देष आणि स्पर्धा इतकी टोकाला गेली होती की, त्यांनीच एकमेकांचे नामकरण केले आहे.

धुळे : भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना "चंपा' म्हटले जाते; हे वाईट वाटते. पण "चंपा' हे नाव गिरीष महाजनांनीच ठेवले हे चंद्रकांत पाटील यांना माहित नाही. कारण एक वेळेस महाजनांच्या कार्यालयात बसलो असतांना अरे त्या 'चंपा'ला फोन लाव असा उल्लेख केला असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी म्हटले आहे. 

अनिल गोटे यांनी 27 जूनला पुन्हा एक पत्रक काढले असून यात राज्यातील भाजप नेते पडळकरांच्या नथीतुन मराठा समाजावर तीर मारुन धनगरांना उसकावीत आहेत. अर्थात पडळकरांनी आपल्या वक्तव्याच स्पष्टीकरण देतांना 'भावनेच्या भरात मी बोलून गेलो' असे म्हटले. भावनेच्या भरात बोलले असे खरे मानले तरी सुध्दा 'पोटात होत तेच ओठात आले' असा अर्थ होत असल्याचे म्हटले आहे. 

वाचा पत्र 

Image may contain: textImage may contain: text

नामकरणाची संधी मिळतच नाही 
गोटे यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे, की भाजपमधील नेत्यांचे नाव बदलविण्याची संधी त्यांच्याच पक्षातील नेतेच देत नाही. आपापसातील व्देष आणि स्पर्धा इतकी टोकाला गेली होती की, त्यांनीच एकमेकांचे नामकरण केले आहे. देवेंद्र फडणवीसांना भाजपमधील विरोधी गटात असलेले अनेक नेते फडणवीसांना "टरबुज्या' म्हणत असल्याचे देखील गोटे यांनी आपल्या पत्रकात नमूद केले आहे. नाव आणि आडनाव एकत्र करुन उल्लेख करण्याची पध्दत भाजपमध्ये आहे. कारण नरेंद्र मोदी यांना "नमो', अमित शाहांना "मोटाभाई' म्हणून संबोधले जाते. त्याप्रमाणेच चंद्रकांत पाटील यांना देखील "चंपा' म्हणत असावेत. असे आपले मत असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी म्हणत भाजपवर टीका केली आहे. 

कदमांना गोटेंचा इशारा 
भाजपचे प्रवक्ते राम कदम प्रसार माध्यमांसमोर बोलतांना 'अनिल गोटे यांचे वय झाले' असे म्हणाले. माझ्या वयाची त्यांना नेमकी काय अडचण हे समजले नाही. वयाचा आणि वक्तव्याचा नेमका संबंध आला कुठे? नाथाभाऊंच्या प्रकृतीबद्दल पक्षातील विरोधकांकडून अशीच वक्तव्ये केली जात होती. समुद्र किनारी जावून तोकड्या चड्ड्यांमध्ये फोटो सेशन केले. राहुल महाजनच्या समवेत महिलेशी केलेल्या वर्तनावर वयाचे मुल्यमापन करायचे का? हे राम कदमांची लक्षात घ्यावे. माझ्याबद्दल जेवढे वैयक्तीक बोलाल तेवढेच मी तुम्हाला समजणाऱ्या भाषेत उत्तर देईन ! माझ्या नादी लागू नका,असा इशाराच गोटे यांनी दिला आहे. गोटे म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांना मी महारोग म्हणालो नाही. संतापाच्या भरात वगैरे काही बोललो नाही. उलटपक्षी माझ्या मनात उसळलेल्या संतापाच्या ज्वालामुखीची आग बाहेर पडू नये म्हणून संयमी वक्तव्य केले. माध्यमांशी जे बोललो तेच पत्रकात आहे. शांत डोक्‍याने संतापावर नियंत्रण ठेवून लिहले आहे. फडणवीसांना महारोगाची उपमा दिली. 'महारोगी' असे म्हटले असल्याचे गोटे यांनी पत्रकात म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule anil gote later chandrakant patil and fadanvis