इथे साडेपाचशे अर्जदार यासाठी आहेत वेटींगवर

ramai aawasramai aawas
ramai aawasramai aawas

धुळे : रमाई आवास योजनेंतर्गत मागील काळात मंजूर घरकुलांची शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती झाली नसल्याचे दिसून येते. दुसरीकडे 2019-20 या आर्थिक वर्षात तब्बल साडेपाचशेवर अर्ज प्राप्त आहेत. या अर्जांच्या मंजुरीसह इतर आनुषंगिक कार्यवाही महापालिकेकडून सुरू आहे. 

शासनाच्या रमाई आवास योजनेंतर्गत अनुसूचित जाती संवर्गातील पात्र लाभार्थ्यांना घरकुलांसाठी अनुदान देण्यात येते. पूर्वी दोन लाख रुपये अनुदान मिळायचे, आता यात 50 हजारांची भर पडून एकूण अडीच लाख रुपये अनुदान मिळते. 2012-13 मध्ये एकूण 50 घरकुले मंजूर होती. त्यासाठी 91 लाख 50 हजार रुपये अनुदान प्राप्त झाले. मात्र, या निधीतून केवळ 32 घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यासाठी लाभार्थ्यांना 64 लाख रुपये वितरित झाले. 2017-18 मध्ये एकूण 54 घरकुले मंजूर होती.

महापालिकेकडे 47 प्रस्ताव प्राप्त झाले. सर्व 47 लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता म्हणून एक लाख 25 हजार रुपये वितरित करण्यात आले. त्यातील 13 लाभार्थ्यांना एक लाख रुपयांचा दुसरा हप्ताही वितरित झाला तर 27 लाभार्थ्यांना दुसरा हप्ता वितरित करण्याची कार्यवाही सुरू आहे. मात्र, 47 पैकी केवळ 8 घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. 2018-19 मध्ये एकूण 50 प्रकरणे मंजूर झाली, त्यातील 40 कामांना कार्यादेश देण्यात आले आहेत. अर्थात या तीनही आर्थिक वर्षात मंजूर घरकुलांचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले नसल्याचे दिसून येते. मंजूर कोट्यापैकी शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती न होण्यामागे नेमकी काय कारणे आहेत हा मात्र प्रश्‍नच आहे. 

साडेपाचशेवर अर्ज पेंडिंग 
दरम्यान, 2019-20 या आर्थिक वर्षात महापालिकेकडे एकूण 567 अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांना मंजुरी देण्यासह आनुषंगिक पूर्ततेची कार्यवाही सुरू असल्याचे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. या 567 पैकी 388 अर्ज समाजकल्याण विभागाकडे तर उर्वरित अर्ज महापालिकेकडे प्राप्त झाले आहेत. 

रमाई आवासची स्थिती 
वर्ष...मंजूर घरकुले... कार्यादेश...कामे पूर्ण 
2012-13...50..........32 
2017-18...54...47...08 
2018-19...50...40...00 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com