धुळे, दोंडाईचात सीएनजी-पीएनजी गॅस प्रकल्प : मंत्री जयकुमार रावल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

धुळे ः नाशिकनंतर धुळे व दोंडाईचा शहरातही सीएनजी-पीएनजी गॅस पाइपलाइन प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यामुळे धुळे, दोंडाईचा शहरातील नागरिकांना स्वस्त, सुरक्षित, प्रदूषण विरहित नॅचरल गॅसचा पुरवठा पाइपलाइनद्वारे घरपोच 24 तास उपलब्ध होणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीने रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांना ही माहिती दिली. 

नागरिकांना स्वस्त, सुरक्षित, प्रदूषण विरहित गॅसपुरवठा घरपोच करता यावा, यासाठी केंद्र सरकारने नॅचरल गॅस योजना सुरू केली आहे. पीएनजीआरबी नवव्या लिलाव फेरीत महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडतर्फे नाशिक व धुळे जिल्ह्याचा समावेश केला आहे. ही योजना दोंडाईचात तत्काळ सुरू करावी, यासाठी पर्यटनमंत्री रावल यांनी पाठपुरावा केला आहे. 
सध्या नाशिकमध्ये महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीतर्फे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाले की त्वरित धुळे जिल्ह्यात दोंडाईचा येथे काम सुरू केले जाईल, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ए. एम. तांबेकर, संचालक राजेश पांडे यांनी मंत्री रावल यांना पत्राद्वारे दिली. 

गॅस घरपोच मिळणार 
केंद्र सरकारच्या सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन (सीजीडी) प्रोजेक्‍ट योजनेंतर्गत दोंडाईचा शहरात सीएनजी-पीएनजी गॅस पाइपलाइन प्रकल्प राबवला गेला, तर दोंडाईचात एक लाख 10 हजार गॅसजोडण्या दिल्या जातील. तसेच हजारो वाहने डिझेल, पेट्रोल वापरकर्त्यांना निम्म्याहून अधिक स्वस्त किमतीत, सुरक्षित, मुबलक, प्रदूषण विरहित नॅचरल गॅस (सीएनजी-पीएनजी) घरपोच पाइपलाइनद्वारे मिळणार आहे.

Web Title: marathi news dhule CNG project dondaecha