esakal | धुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी साडेदहा कोटींची भरपाई
sakal

बोलून बातमी शोधा

धुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी साडेदहा कोटींची भरपाई

बाधितांच्या बँक बचत खात्यात मदतीची रक्‍कम जमा करावी. 
रोखीने किंवा निविष्ठा स्वरूपात मदत देऊ नये. मदतीच्या रकमेतून संबंधित बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये.

धुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी साडेदहा कोटींची भरपाई

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

 धुळे ः जिल्ह्यात यंदा जून ते ऑक्टोबरपर्यंत झालेली अतिवृष्टी आणि पुरामुळे विविध पिकांचे नुकसान झाले. यात सर्वसाधारण आणि बहुवार्षिक पिकांचे किमान ३३ टक्के नुकसान झाले. बाधित शेतकऱ्यांना शासनाने मदत जाहीर केली. जिरायत व आश्रवासित सिंचनाखालील पिकांसाठी प्रतिहेक्टर दहा हजार, तर बहुवार्षिक पिकांसाठी प्रतिहेक्‍टर २५ हजारांच्या मर्यादेत नुकसानभरपाई दिली जात आहे. यानुसार जिल्ह्यात एकूण दहा कोटी ४९ लाख २६ हजारांचा निधी वितरित केला जाईल. 

शासन निर्णयातील दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसादांतर्गत दोन हेक्टरच्या मर्यादेत सात कोटी १६ लाख ६० हजारांचा, तर याप्रमाणेच राज्य शासनाकडून तीन ३२ लाख ६० हजार असा एकूण दहा कोटी ४९ लाख २६ हजारांचा निधी मंजूर झाला. यात ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्या बहुवार्षिक पिकांना भरपाई मान्य असेल. कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामसेवकाच्या संयुक्‍त स्वाक्षरीने पूर्ण झालेल्या पंचनाम्यानुसार तहसीलदारांनी आर्थिक मदतीचे वाटप करावे. संबंधित बाधितांच्या बँक बचत खात्यात मदतीची रक्‍कम जमा करावी. 
रोखीने किंवा निविष्ठा स्वरूपात मदत देऊ नये. मदतीच्या रकमेतून संबंधित बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये. त्यावर जिल्हा उपनिबंधकांनी नियंत्रण ठेवावे, अशी सूचना शासनाने दिल्याचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सांगितले. 


जिल्ह्याला नुकसानभरपाई अशी (लाखांत) 
तालुका...............रक्कम 
धुळे...................०२४.५०३०१ 
साक्री.................४२७.२२६२३ 
शिरपूर................२४८.१९२२३ 
शिंदखेडा..............३४९.३३८५३ 
---- 
एकूण..................१०४९.२६ 
 

संपादन- भूषण श्रीखंडे