"दीपयोग' अन्‌  'कोरोना' गो' ची आज साद... पण का?

narendra modi vaishali patil
narendra modi vaishali patil

धुळे : देशातून संसर्गजन्य "कोरोना व्हायरस'ला हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आज (ता. 5) रात्री नऊनंतर सर्वत्र, घरोघरी अंधारात नऊ मिनिटे ज्योत, दिवे, टॉर्च लावण्याचा संकल्प सांगितला. त्यावर सोशल मीडियावर विनोद, टीकाटिप्पणी होऊ लागली. बरेच संभ्रमित झाले. मोदींचा हा काय नवीन फंडा, असा प्रश्‍न अनेकांना पडला. पण मानसशास्त्रज्ञ व तत्त्ववेत्ते सॉक्रेटिस, ऍरिस्टॉटल, प्लेटो, स्पिनोझा, थोरो आदींच्यादृष्टीने विचार केला व ज्यांनी वेद, उपनिषदे अभ्यासली आहेत ते याचा आवडीने स्वीकार करतील, असे मानसशास्त्र तज्ञ्ज, तत्त्वज्ञानाच्या अभ्यासक प्रा. वैशाली पाटील यांनी सांगितले.

प्रा. पाटील यांनी सांगितले, की देशावर "कोरोना'चे संकट असताना 5 एप्रिलला रात्री नऊनंतर दिवे लावायचे, टॉर्च चमकवायच्या... हा काय प्रकार आहे...यावर खल होतोय. प्रत्यक्षात ब्रम्हांडातील सर्व वस्तू गुरुत्वाकर्षणाने एकमेकांसोबत जोडल्या गेल्या आहेत. विश्व हे नैसर्गिक कायद्यानुसार चालते. ज्याप्रमाणे भौतिकशास्त्राचे नियम विमान उडायला मदत करतात, तसे वीज तयार करायला सजीव व निर्जिवात असलेली गुरुत्वाकर्षण शक्ती मदत करते. जैविक लहरी या भौतिक लहरींशी परस्पर क्रिया करतात, त्यामुळे शक्तिशाली ऊर्जानिर्मिती होते, जी प्रबळ इच्छापूर्तीकडे घेऊन जाते.

सकारात्मकतेतून अंधारावर मात
आयुष्य, त्यातील विविध घटकांच्या क्रिया, विचार सकारात्मक आणि नकारात्मक, चांगल्या व वाईट गोष्टीने बनलेले असतात. "कोरोना'विरुद्धच्या लढाईत जर तुम्ही नकारात्मक विचार केले नकारात्मक शक्तीही तुमच्या बाजूने तुम्हीच आकर्षित करत असाल आणि त्याचा त्रास तुम्हाला स्वतःलाच होणार आहे. म्हणून सकारात्मक विचार केला, तरच आपण सकारात्मकतेकडे खेचले जातो. सगळ्यांनी सकारात्मक विचाराने या अंधारावर मात करायची आहे. आपल्या आयुष्यात चांगल्या आणि वाईट गोष्टी घडायला आपले स्वतःचे विचारच कारणीभूत असतात. त्यासाठी तुम्हाला तुमच्या सर्जनात्मक शक्तीविषयी जागृत असायला हवी.

मनाची ताकद अन्‌ "कोरोना गो'
एखादा संकल्प ही उच्च सर्जनात्मक शक्ती आहे. सर्जनाचा नियम हा संकल्पनेपासूनच सुरू होतो. त्यामुळे आज (ता. 5) आपण सर्वजण नऊ मिनिटे फक्त "कोरोना' आपल्या देशातून हद्दपार होण्यासाठी चिंतन करून दिवे, टॉर्च लावणार आहोत. मानसशास्त्रानुसार कोणतेही काम करताना किंवा भाषण ऐकताना कोणत्याही व्यक्तीचे "कॉन्स्ट्रेशन' पहिले सात मिनिटे संपूर्ण शक्तिनिशी असते. त्यानुसार कदाचित त्या दिवशी संपूर्ण देश हा एकाच विचाराने एकाग्र होणार आहे आणि हा आकर्षणाचा नियम वापरून "कोरोना'विरोधात "एक साथ ब्रह्मांडा'मध्ये लढणार आहे. "कोरोना' माझ्या देशातून जाणार आहे, या सकारात्मक ऊर्जेचा वापर ब्रह्मांडात केला जाणार आहे. ज्या वेळी तुम्ही हा विचार करत असाल, तेव्हा ब्रह्मांडातील आकर्षणाचा नियम वापरून ब्रह्मांडाला विनंती करणार आहात. "गो कोरोना गो'...ब्रह्मांडातील गुरुत्वाकर्षण लहरींना तुमच्या इच्छाशक्तीला ऐकावाच लागणार आहे. मनाच्या ताकदीसमोर कोणतीही गोष्ट अशक्‍य नसते.

"दीपयोगा'ची शक्ती उजळेल
आशियात, रशियात 1889 ते 1895 दरम्यान "फ्ल्यू'ने लाख बळी गेले; पण आश्‍चर्य म्हणजे भारताला त्याची झळ दिवाळीच्या महोत्सवाने जाणवली नसल्याचे सांगितले जाते. भारतभर दिवाळीत जेव्हा करोडो दीपांच्या रांगा व अनेक दीपक घराघरांत, शेतात आठवडाभर सायंकाळी प्रज्वलित होतात तेव्हा पिकांवरील किडी, तर आकर्षून मरतातच; पण संपूर्ण देशात एक "दीपयोग' म्हणून हवेतील सूक्ष्मजीव जंतूही जळून मरतात. ज्योती भोवतालची उष्णता हवा फिरवत राहिल्याने जवळजवळ आजूबाजूची सर्व हवा ज्योतीला स्पर्शून जात-येत असते. असंख्य दिव्यांनी असंख्य विषाणू, बुरशी, जिवाणू आदी रोगजंतू मरून वातावरण निर्जंतुक होत असते. चला, तर मग आत्मविश्वास वाढविण्यासाठी, "कोरोना'ला "शुभम करोती' म्हणत गुरुत्वाकर्षण शक्तीने व अब्जावधी दीप-ज्योतींनी हद्दपार करण्यासाठी एकत्र येऊ या..."कोरोना'सोबत एकत्रितपणे लढू या..., असे आवाहन प्रा. पाटील यांनी केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com