esakal | धुळ्यात व्हेटिंलेटरसाठी मारामार; रूग्‍ण होताय अत्‍यवस्‍थ 
sakal

बोलून बातमी शोधा

ventilator

शहरासह जिल्ह्यात सरकारी व खासगी रुग्णालये मिळून सरासरी शंभर व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. ही संख्याही आता कमी पडू लागली आहे. ऑक्सिजनचे शरिरातील प्रमाण कमी असलेले आणि न्यूमोनियाच्या रुग्णांना ऑक्सिजनयुक्त बेडसह आयसीयूमधील व्हेंटिलेटरची गरज भासू लागली

धुळ्यात व्हेटिंलेटरसाठी मारामार; रूग्‍ण होताय अत्‍यवस्‍थ 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : शहरासह जिल्ह्यात ‘कोरोना’ची रुग्णसंख्या वाढतच आहे. यात सरकारी व खासगी रुग्णालये मिळून उपलब्ध सरासरी १०० व्हेंटिलेटर आधीच उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी वापरात असल्याने अन्य गरजेच्या रुग्णांना ही सुविधा मिळणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे सरकारी व वैद्यकीय यंत्रणेला तत्काळ योग्य ती पावले उचलावी लागतील. दरम्यान, सरकारी रुग्णालयात शनिवारी (१२ सप्टेंबर) बाधित एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर नवे १४१ रुग्ण बाधित आढळले. 
शहरासह जिल्ह्यात सरकारी व खासगी रुग्णालये मिळून सरासरी शंभर व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. ही संख्याही आता कमी पडू लागली आहे. ऑक्सिजनचे शरिरातील प्रमाण कमी असलेले आणि न्यूमोनियाच्या रुग्णांना ऑक्सिजनयुक्त बेडसह आयसीयूमधील व्हेंटिलेटरची गरज भासू लागली आहे. त्यासाठी रुग्णांची मारामार होत आहे. या स्थितीत शक्य त्या उपाययोजना करण्यात वैद्यकीय यंत्रणेसह हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गुंतले आहे. जिल्ह्यात ज्या ठिकाणी व्हेंटिलेटरची सुविधा नाही तेथील रुग्णांना धुळे शहरातील खासगी रुग्णालये आणि सरकारी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यांना ही सुविधा लागलीच उपलब्ध होत नसल्याने पेचप्रसंग निर्माण होत आहे. 

‘कोरोना’मुळे बळी 
हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शनिवारी जैताणे (ता. साक्री) येथील ७० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील बळींची संख्या ३२१ झाली आहे. यात महापालिका क्षेत्रात १४८, तर उर्वरित ग्रामीण भागात १७३ व्यक्तींचा बळी गेला आहे. तसेच शहरासह जिल्ह्यात शनिवारी बाधित १४१ रुग्णांची भर पडल्याचे एकूण संख्या १० हजार ७९६ झाली आहे. धुळे जिल्हा रुग्णालयाचे १४३ नमुने तपासणीपैकी २५ अहवाल पॉझिटिव्ह, दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयाचे १०६ पैकी १५, शिरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे १४० पैकी २२, भाडणे-साक्री कोविड सेंटरचे ४६ पैकी १६, महापालिका पॉलिटेक्निक सेंटरचे १४४ पैकी १८, खासगी लॅबचे ९८ पैकी ४५ अहवाल पॉझिटिव्ह आले. 

loading image