esakal | मृतदेहांसाठी पारदर्शक बॅग 
sakal

बोलून बातमी शोधा

corona death

कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृत्यूनंतर संसर्ग टाळण्यासाठी संबंधित व्यक्तीचा मृतदेह एका बॅगेत ठेवून तो अंत्यसंस्कारासाठी नेला जातो. दरम्यान, यासाठी वापरण्यात येत आलेली बॉडीबॅग अपारदर्शक असल्यास मृतदेहाची ओळख पटण्यास अडचण येणे,

मृतदेहांसाठी पारदर्शक बॅग 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृतदेहासाठी यापुढे बॉडीबॅगमधून संबंधित व्यक्तीचा चेहरा दिसू शकेल, अशा प्रकारच्या बॉडीबॅगचा वापर करावा, अशा मार्गदर्शक सूचना आरोग्यसेवा संचालनालयाच्या संचालकांनी संबंधित सर्व यंत्रणांना दिल्या आहेत. तसे पत्र आरोग्य उपसंचालकांनी संबंधितांना दिले आहेत. 
कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृत्यूनंतर संसर्ग टाळण्यासाठी संबंधित व्यक्तीचा मृतदेह एका बॅगेत ठेवून तो अंत्यसंस्कारासाठी नेला जातो. दरम्यान, यासाठी वापरण्यात येत आलेली बॉडीबॅग अपारदर्शक असल्यास मृतदेहाची ओळख पटण्यास अडचण येणे, मृतदेहाची अदलाबदल होण्याचीही शक्यता नाकारता असते. शिवाय रुग्णांच्या नातेवाइकांना संबंधित मृत व्यक्तीचे अंतिम दर्शनही होऊ शकत नाही. त्यामुळे हा रुग्णांच्या नातेवाइकांसाठी भावनिक प्रश्‍न निर्माण होतो, असे नमूद करत आरोग्यसेवा संचालनालयाने बॉडीबॅगबाबत नव्याने मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. 

चेहरा दिसेल अशी बॅग वापरा 
कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृतदेहासाठी वापरल्या जाणाऱ्या बॉडीबॅगधून रुग्णाचा चेहरा दिसू शकेल अशा पद्धतीच्या बॉडीबॅगचा वापर करण्यात यावा. त्यामुळे संबंधित व्यक्तीचा मृतदेह बॉडीबॅगेत ठेवलेला असतानाही नातेवाइकांना मृत व्यक्तीचे अंतिम दर्शन घेता येईल. तसेच मृतदेहाची ओळख पटण्यासाठी मदत होईल. त्यामुळे अशा पद्धतीच्या बॉडीबॅग वापर करण्यात यावा असे पत्र आरोग्यसेवा संचालक (पुणे) यांनी राज्यातील आरोग्य विभागाचे उपसंचालक, जिल्हा आरोग्याधिकारी (जिल्हा परिषद), जिल्हा शल्यचिकित्सक, महापालिका आरोग्याधिकारी आदींना दिले आहे. 
 

loading image