esakal | धुळे जिल्ह्यात पाणी पातळीत विक्रमी २.०४ मीटरने वाढ 
sakal

बोलून बातमी शोधा

dhule dam water lavel

यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी रडवले. जोरदार पावसाने शेतांनी तलावाचे रुप धारण केले. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला.

धुळे जिल्ह्यात पाणी पातळीत विक्रमी २.०४ मीटरने वाढ 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


सोनगीर (धुळे) ः यंदा जोरदार पावसामुळे धरण, बांधारे, नाले, नद्या ओव्हर फ्लो झाल्याने जिल्‍ह्‍यातील पाण्याची पातळी सरासरी २ .०४ मीटरने वाढली असून हा एक उच्चांक आहे. गतवर्षी १.७३ मीटरने पातळी वाढली होती. पाण्याचा पातळीचा दर्शक सामान्य असल्याने अशा स्थितीत यंदा पाणी टंचाई जाणवणार नाही. सर्वाधिक म्हणजे २. ५९ मीटरने पाण्याच्या पातळीत वाढ शिंदखेडा तालुक्यात झाली आहे. त्यापाठोपाठ शिरपूर, साक्री व सर्वांत कमी धुळे तालुक्यात १.६२ मीटर पाणी पातळी वाढ नोंद झाली आहे. 

यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी रडवले. जोरदार पावसाने शेतांनी तलावाचे रुप धारण केले. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. दरम्यान गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने दुष्काळामुळे घरोघरी व प्रत्येक शेतात शेकडो बोअरवेल खोदण्यात आल्या. त्यामुळे पाण्याची पातळी खोल गेली. या पार्श्‍वभूमीवर यंदा पाण्याची सरासरी पातळी वाढल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. जिल्हातील पाणी टंचाई दूर झाली आहे. धुळे येथील भूवैज्ञानिकांनी धुळे जिल्हातील पाणी पातळीची पहाणी केली. धुळे तालुक्यातील गेल्या पाच वर्षांत सरासरी स्थिर भूजल पातळी ४.५८ मीटर, साक्रीची ४.०३ मीटर, शिंदखेडा ८.०४ मीटर, शिरपूर ६.१८ मीटर अशी जिल्ह्यात सरासरी ५.७१ नोंद झाली होती. गेल्या सप्टेंबर २०१९ मध्ये पाण्याची पातळी नोंदली असता ती वाढलेली आढळून आली होती. यंदा नुकतीच पाहणी केली असता धुळे तालुक्यात २.९६ मीटर, साक्री २.१२ मीटर, शिंदखेडा ५.४५ मीटर, शिरपूर ४.१६ मीटर अशी नोंद झाली. अशी माहिती भूवैज्ञानिक विभागाचे अनुपमा पाटील यांनी दिली. 

मोजण्याची पद्धत 
भूवैज्ञानिक दरवर्षी सप्टेंबर अखेरीस पाणी पातळी मोजतात. त्यासाठी जिल्ह्यात १०४ विहिरी राखीव ठेवल्या असून त्या विहिरीच्या पाण्याच्या पातळीवरून भूगर्भातील पातळीची नोंद केली जाते. धुळे तालुक्यात ३२ विहिरीची पातळी तपासण्यात आली. साक्री तालुक्यात ३१, शिंदखेडा तालुक्यात २४ व शिरपूर तालुक्यात १७ विहिरींची तपासणी झाली. त्यावरून हा निष्कर्ष काढण्यात आला. 

तालुका प्रमाणे वाढलेली पाण्याची पातळी 
१) धुळे - - - - १.६२ मीटर 
२) शिंदखेडा - २.५९ मीटर 
३) शिरपूर - - - २.०२ मीटर 
४) साक्री - - - - १. ९१ मीटर 

जिल्ह्यातील एकूण सरासरी वाढ - २.०४ मीटर 
 
संपादन ः राजेश सोनवणे

loading image
go to top