धुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा-आमदार कुणाल पाटील

Dhule Drought News : तीन आठवड्यांपासून सोसाट्याचा वारा वाहत आहे. ढगांची गर्दी होताना दिसते, पण पाऊस पडत नाही.
धुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा-आमदार कुणाल पाटील
Summary

जिल्ह्यातील मध्यम, लघु आणि इतर पाटबंधारे प्रकल्पात जलसाठा कमी प्रमाणात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर पडली आहे.

धुळे : पुरेसा पाऊस नसल्याने उद्भवलेल्या स्थितीत जिल्ह्यात दुष्काळ (Drought) जाहीर करावा, या मागणीसाठी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील (MLA Kunal Patil) यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांची (Collector) तालुका काँग्रेसच्या (Congress) शिष्टमंडळासह शेतकऱ्यांनी (Farmers) भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन दिले.

धुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा-आमदार कुणाल पाटील
गावात पाणी टंचाई..तरी स्वखर्चाने भागवतोय गावकऱ्यांची तहान!


आमदार पाटील म्हणाले, की राज्यात इतरत्र पाऊस असताना जिल्ह्यात तीन ते चार आठवड्यांपासून पावसाने दडी मारली आहे. पिके कोमेजू लागली आहेत. जिराईत शेतीकडे पाहिले तर जीव कासावीस होतो. बागायतदार शेतकरीही विहिरींची पातळी घटल्याने चिंतेत आहेत. जिल्ह्यात अद्याप मुसळधार पाऊस नसल्यामुळे नद्या, नाले, ओढे कोरडे ठाक आहेत. परिणामी विहिरींचा उद्भव आटत आहे. जिराईत आणि बागाईत शेतकरी आर्थिक संकटात आहे. जिल्ह्यातील मध्यम, लघु आणि इतर पाटबंधारे प्रकल्पात जलसाठा कमी प्रमाणात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर पडली आहे.

धुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा-आमदार कुणाल पाटील
वनक्षेत्रपालांअभावी वनीकरणाच्या विभागाचा गाढा चालणार कसा?


तीन आठवड्यांपासून सोसाट्याचा वारा वाहत आहे. ढगांची गर्दी होताना दिसते, पण पाऊस पडत नाही. शेतकरी, शेतमजूर आणि सर्वच घटक चातकसारखी पावसाची वाट पाहत आहेत. काही गावांमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांचे सरकार असल्याचे गेल्या दोन वर्षात स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, आर्थिक आधार देण्यासाठी या सरकारने कधीच मागेपुढे पाहिले नाही. महाविकास आघाडी सरकारचे प्रतिनिधी म्हणून ही अवर्षणप्रवण बाब शासनाच्या निदर्शनास आणून द्यावी आणि दुष्काळ जाहीर करावा. कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत शासनस्तरावर मार्ग काढावा, अशी मागणी आमदार पाटील यांच्यासह गुलाब कोतेकर, डॉ. दरबारसिंग गिरासे, बाजीराव पाटील, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा गायत्री जयस्वाल, साहेबराव खैरनार, डॉ. दत्ता परदेशी, पंढरीनाथ पाटील, अशोक सुडके, बापू खैरनार, गणेश गर्दे, हर्षल साळुंके, किरण नगराळे, हसन पठाण, आबा गर्दे आदींनी केली आहे. दुष्काळी स्थितीबाबत शासनाला अहवाल पाठवू, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com