ती माझी मैत्रिण...तिचे नाव का घेतोय म्हणत... 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 July 2020

राजेश यास मारहाण करण्यास सुरवात केली. लाकडी दांड्याने पोटावर, पाठीवर, हातापायावर मारहाण केली. शिवीगाळ व धमकी दिली. त्यात फिर्यादी जखमी झाला असून त्यास खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

धुळे : ती माझी मैत्रिण आहे, तिच्याशी का बोलतोस आणि माझ्या गर्लफ्रेंडचे नाव का घेतो...असा जाब विचारत एका तरुणासह त्याच्या पाच मित्रांनी तरुणाला केलेल्या हाणामारीत तरुण जखमी झाला. ह्या प्रकरणी सहा जणांविरुद्ध देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एकाला अटक करण्यात आली आहे. 
धुळे शहरातील देवपूर परिसरात सदर प्रकार घडला आहे. यात मारहाण करण्यात आलेल्या राजेश भानुदास जाधव (वय 33, रा. पंचाळवाडा देवपूर, धुळे) याने दिलेल्या फिर्यादीनुसार निखील सराफ याने फिर्यादीला दम देत "तू माझ्या गर्लफ्रेंडचे नाव का घेतो' असा जाब विचारला त्यातून भांडण झाले. त्यावेळी शुभम भामरे, ऋषभ, गौरव उर्फ जम्ब्या नरोटे, अजय कांबळे, बंटी कांबळे (सर्व रा. देवपूर) यांनी राजेश यास मारहाण करण्यास सुरवात केली. लाकडी दांड्याने पोटावर, पाठीवर, हातापायावर मारहाण केली. शिवीगाळ व धमकी दिली. त्यात फिर्यादी जखमी झाला असून त्यास खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून निखील सराफ यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास हेकॉ बागूल करीत आहेत. 

पोलिस स्टेशनलगतच अवघ्या पाच मिनिटात केले काम 
वर्दळीच्या बारापत्थर रोडवरील आणि तहसील कार्यालयाशेजारी असलेल्या धुळे तालुका पोलिस ठाण्यालगत चोरट्यांनी पान टपरी, स्टॅंपवेंडरकडे हातसफाई केली. यानंतर चोवीस तासात याच पोलिस ठाण्याच्या विरूध्द दिशेला असलेल्या दुकानातून तब्बल 14 लाख किमतीचे मोबाईल हॅंडसेट लंपास केले. चोरट्यांनी दिलेले आव्हान पोलिस कसे हाताळतात याकडे सर्वांचे लक्ष असेल. धुळे तालुका पोलिस ठाण्याच्या अवघ्या 200 ते 300 मिटर अंतरावर असलेले मोबाईल दुकान सोमवारी पहाटे पाचला चोरट्यांनी फोडले. त्यांनी 14 लाखांच्या किंमतीचे मोबाईल लंपास केले. चोरट्यांनी अवघ्या पाच मिनिटात गोणीमध्ये मोबाईल भरुन पोबारा केला. या घटनांची भनक देखील पोलिस यंत्रणेला लागली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule five boys heeting one boy in issue girlfriend