चौघांनी डोळ्यांनी बघितले ते भयानक दृष्य आणि रस्त्यावरील खड्डे बुजवाया लागले   

भिलाजी जिरे
Wednesday, 28 October 2020

एक मालवाहतूक गाडी अचानक रस्त्यातील मोठ मोठ्या खड्ड्या वाचविण्याच्या प्रयत्नात पलटी झाली. आणि भिषण अपघाताचे दृष्य आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितला. आणि मग मनात विचार केला. 

वार्सा ः उमरपाटा ता.साक्री परिसरातील उच्च शिक्षीत तरुणांनी नोकरी नसल्याने एकत्र व्यवसाय सुरू केला. एकदा अचनाक चौघांच्या डोळ्यासमोर अशी घटना घडली की या चार ही  मित्रांनी सामाजिक दातृत्व समजून नवापूर पिंपळनेर रस्त्यावरील उमरपाटा येथील रस्त्यावरील खड्डे माती टाकून बुजविण्याचे कामच सुरू केले.

आवश्य वाचा- एकजुटीच्या बळावर तरुणांनी श्रमदानातून साकारला वनराई बंधारा 

संजय कुंवर, राजेंद्र कुवर, गुलाब सिंग मावची, महेंद कुवर हे चौघे मित्र असून
उच्च विद्याविभुषीत असून बी.ए., बी.काँम, डी.एड केले आहे. शिक्षीत असून देखील नोकरी नसल्यने चौघांनी एकत्र येवून 'हाँटेल मैत्री कट्टा' सुरू केला. तसेच उमरपाटा ता.साक्री येथील 'आदिवासी सेवा प्रतिष्ठान' या संस्थेच्या माध्यमातून आरोग्य शिबिर, सामाजिक व शैक्षणिक कार्य, तसेच गरजू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व मदत, एखाद्या कार्यक्रम स्थळी मदत करणे अशी कामे ते करतात. संस्थेचे अध्यक्ष डॉ.विशाल वळवी, जि.प.सदस्य छगन राऊत सामाजिक कार्यकर्ते योगेश महाले, माध्यमिक शिक्षक प्रकाश राऊत ह्यांचे यांची देखील सहकार्य चौघांना आसतात. 

आणि बघितले ते भयानक दृष्य...

संजय, राजेंद्र, गुलाब, महेंद्र हे चौघे मित्र त्यांची हाँटेल मैत्री कट्टा येथे होते. रस्त्यालगत हाॅटेल असल्याने एक मालवाहतूक गाडी अचानक रस्त्यातील मोठ मोठ्या खड्ड्या वाचविण्याच्या प्रयत्नात पलटी झाली. आणि भिषण अपघाताचे दृष्य आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितला. आणि मग मनात विचार केला आणि मग चौघांनी रस्त्यावरील खड्डे बुजवीण्याच्या कामाला सुरवात केली. 

 

प्रशासनाने लक्ष देण्याची गरच

नवापूर पिंपळनेर रस्त्यावरील उमरपाटा परिसरात रस्त्यावर मोठे खड्डे होते. ते आमच्या परीने बुजले पण या रस्त्याच्या अवस्था बघून तत्काळ खड्डे बुजविण्याचे काम प्रशासनाने करावे अशी ईच्छा आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule Four friends are working to fill the potholes on the bad road