वाहून गेलेल्या रस्‍त्‍याच्या दुरुस्तीला सुरवात 

heavy rain damage road
heavy rain damage road

म्हसदी (धुळे) : यंदा प्रथमच ३० वर्षांनंतर जोरदार पावसामुळे कायकंडा धरण तुडुंब भरले आहे. वनक्षेत्रातील पाण्याचा विसर्ग सुरूच असल्याने सांडव्याच्या पाण्यामुळे रस्‍ता वाहून गेल्याने ‘सर आली धावून अन् रस्ता गेला वाहून’ या शीर्षकाखाली ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेत वाहून गेलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. 
२७ सप्‍टेंबरला सकाळी सिमेंट पाईप टाकून रस्ता दुरुस्त करण्यास प्रारंभ झाला. याठिकाणी आठ पाईप टाकून रस्ता दुरुस्त केला जात आहे. पंचायत समितीचे सदस्य राजधर देसले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे विनोद वाघ, शाखा अभियंता अनिल बैसाणे, तांत्रिक अभियांत्रिकी सहाय्यक हर्षल पाटील, मनोज करनकाळ, कुणाल भदाणे, मनोज खैरनार, राकेश खैरनार, काळगावचे माजी सरपंच रावसाहेब ठाकरे, नारायण मोहिते, भूषण खैरनार, बालू निकम, तुषार भदाणे उपस्थित होते. रस्ता तिसऱ्यांदा दुरुस्त करण्याची वेळ आली आहे. आमदार मजुळा गावित यांनी या कामासाठी पाठपुरावा केला. 

धरणाचा दुसरा सांडवाही दुरुस्त होईल 
या पूर्वी दोन वेळा रस्ता दुरुस्त करण्यात आला होता. आता तिसरी वेळ आहे. सततच्या पावसामुळे चिराई, राहुड (ता. सटाणा) व काळगाव वनक्षेत्रातील पाण्याचा विसर्ग सुरूच असल्याने सांडव्याच्या पाण्यामुळे रस्सा वाहून गेल्याने म्हसदीकडून काळगावसह नामपूरकडील(ता. सटाणा)सर्व गावांचा संपर्क तुटला आहे. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभाग कायकंडा धरणाचा दुसरा सांडवा दुरस्त करणार असल्याची माहिती पंचायत समितीचे सदस्य श्री. देसले यांनी दिली. काटेरी झुडपे तोडून पाणी वाहून जाईल, अशी व्यवस्था केली जाणार आहे. दुसरीकडे गावालगत अमरावती नदीपात्रात पाणी आहे. सर्व पात्रात पाणी असल्याने चारचाकी, दुचाकी चालविणे जिकिरीचे झाले आहे. यंदा पावसाने सातत्य ठेवल्याने रस्त्याची वाट लागली आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी मिटविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com