दमदार पावसाने कायंकडा धरण फुल्ल...साडी चोळी वाहून जलपुजून

दमदार पावसाने कायंकडा धरण फुल्ल...साडी चोळी वाहून जलपुजून

म्हसदी : दमदार पावसामुळे गेल्या तीस वर्षानंतर येथील काळगाव रस्त्यावरील कायकंडा धरण तुडूंब भरले आहे.आज सकाळी आमदार मंजुळा गावित यांनी साडी चोळीचा आहेर चढवत जलपुजन केले.दुसरीकडे धरण पाझरत असल्याने लगतच्या शेतातील खरिप पिके पाण्यात गेेेली असून आमदार सौ.गावित यांनी नुकसानीची पाहणी केेली.भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेतक-यांनी केली. 

आज सकाळी आमदार गावित यांनी कायकंडा धरण व विश्वेश्वर महादेव जवळच्या त्रिवेणी संगमावर जलपुजन करत ग्रामस्थांशी संवाद साधला.जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डाॅ.तुळशीराम गावीत,धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाचे अध्यक्ष सुभाष देवरे,जेष्ठ संचालक गंगाराम देवरे,पंचायत समितीचे सदस्य राजधर देसले,काळगावचे सरपंच संजय भामरे,म्हसदीचे माजी सरपंच चंद्रकांत देवरे,साक्री दुध संघाचे सभापती प्रवीण खैरनार,पंकज मराठे,ग्राम पुरोहित गणू महाराज,मंगेश नेरे,कुणाल भदाणे, देवेंद्र देवरे,अरुण बेडसे,हिंमत देवरे,निंबा देवरे, विनायक ठाकरे,सोनल नेरे उपस्थित होते.दुष्काळाची प्रचंड झळ सोसणारे म्हसदी गाव कायकंडा तुडूंब भरल्याने सुखावले असले तरी याच पाण्यामुळे अनेक समस्या उभ्या आहेत.धरण ओहरप्लोह झाल्याने अमरावती नदीपात्रात पाणी आहे.वाहत्या पाण्यामुळे म्हसदी आणि काळगावचा संपर्क तुटला आहे.साधी दुचाकीही जात नसल्याने विशेषतः काळगाव येथील ग्रामस्थ हतबल झाले आहेत.काळगाव रस्त्यावरील पठाडी चिंच नाल्यावर पाणी असल्याने संपर्क तुटला आहे.रस्ता दुरस्त करावा अशी मागणी सरपंच संजय भामरे यांनी आमदार गावित यांच्याकडे केली.

उभी पिके पाण्यात......
1973 ला येथील अमरावती नदीत काळगाव रस्त्यालगत कायकंडा लघु प्रकल्प झाला.यंदा प्रथमच पूर्णक्षमतेने भरला आहे.दुसरीकडे प्रचंड गळती असल्याने पाणी पाझरत आहे.गळतीमुळे धरणा लगतच्या सर्वे नंबर 143 मधील पाच गटातील तीन शेतक-यांची शेती पाण्याखाली गेली आहे.सदर क्षेत्र बुडीताखाली नसल्याचे नुकसान ग्रस्त शेतकरी भिकन वेडू भदाणे,पंडित दिगंबर भदाणे,सुभाष दिंगबर भदाणे आदींचे म्हणणे आहे. 

मका पीक सडण्याच्या मार्गावर.....!
दरम्यान,खरिप हंगामातील मका व अन्य पिके आज पाण्यात असल्याने सडण्याच्या मार्गावर आहेत.शिवाय डाळिंब पिकही पाण्यात असल्याचे शेतकरी भिकन भदाणे यांनी आमदार गावित यांच्या लक्षात आणून दिले.शेती असूनही भूमीहीन रहावे लागत असल्याची व्यथा शेतक-यांनी मांडली.आमदार गावित यांनी नुकसानीची पाहणी केली.
 

 संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com