esakal | धुळ्यात ज्युनिअर 110 वकिलांना मदतीचा हात 
sakal

बोलून बातमी शोधा

advocate

"लॉक डाउन'मुळे अनेक ज्युनिअर वकिलांकडे कोणत्याही प्रकारचे न्यायालयीन काम नव्हते. कुटुंबासह ते घरातच बंदिस्त आहेत. रोजगाराअभावी त्यांना आर्थिक स्थितीशी सामना करावा लागला. त्यांच्यापुढे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा, दैनंदिन गरजा पूर्ण करण्याचा प्रश्‍न निर्माण झाला.

धुळ्यात ज्युनिअर 110 वकिलांना मदतीचा हात 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : "कोरोना'च्या संकटकाळात गरीबच नव्हे तर साधारण घटकांनाही आर्थिक फटका बसला. यात तीन महिन्यांपासून न्यायालये बंद असल्याने अनेक ज्युनिअर वकिलांना दैनंदिन गरजा भागविणेही दुरापास्त झाले. ते लक्षात घेता धुळ्यातील गरजू 110 ज्युनिअर वकिलांना बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ऍण्ड गोवा संघटनेने मदतीचा हात दिला. संबंधित वकिलांना जीवनावश्‍यक वस्तूंचे किट प्रदान केले.

"लॉक डाउन'मुळे अनेक ज्युनिअर वकिलांकडे कोणत्याही प्रकारचे न्यायालयीन काम नव्हते. कुटुंबासह ते घरातच बंदिस्त आहेत. रोजगाराअभावी त्यांना आर्थिक स्थितीशी सामना करावा लागला. त्यांच्यापुढे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा, दैनंदिन गरजा पूर्ण करण्याचा प्रश्‍न निर्माण झाला. ज्युनिअर वकिलांची ही परवड लक्षात घेऊन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ऍण्ड गोवा वकील संघटनेने मदतीचा हात पुढे केला. धुळ्यातील 110 गरजू वकिलांना संघाचे औरंगाबादस्थित उपाध्यक्ष ऍड. अमोल सावंत यांच्या हस्ते जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप झाले. धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ऍड. दिलीप पाटील, ऍड. समीर पंडित, जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तवर, ऍड. बाबा जोशी, ऍड. श्रीराम देशपांडे, ऍड. राहुल भामरे, संघाचे सचिव ऍड. सुरेश बच्छाव, ऍड. विवेक सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

यांचे मिळाले सहकार्य
ऍड. सावंत यांच्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमास वकील संघाचे अध्यक्ष ऍड. पाटील, सचिव ऍड. बच्छाव, ऍड. तवर, ऍड. भामरे, ऍड. गोरक्ष माळी, ऍड. चेतन दीक्षित, ऍड. योगेश खैरनार, ऍड. कुणाल जमादार व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले. संजय ठाकूर, राजू ठाकूर यांनी कीट वाटपासाठी मदत केली. मदतीबद्दल ज्युनिअर वकिलांनी आभार मानले. 

loading image
go to top