Loksabha 2019 : धुळे लोकसभा मतदारसंघात छाननीमध्ये पाच अर्ज अवैध 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

धुळे ः लोकसभेच्या धुळे मतदारसंघासाठी काल (ता. 9) मुदतीअखेर दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची आज सकाळी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात छाननी करण्यात आली. यात पाच उमेदवारांचे पाच अर्ज अवैध ठरले. 

धुळे ः लोकसभेच्या धुळे मतदारसंघासाठी काल (ता. 9) मुदतीअखेर दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची आज सकाळी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात छाननी करण्यात आली. यात पाच उमेदवारांचे पाच अर्ज अवैध ठरले. 
लोकसभेच्या धुळे मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत 36 उमेदवारांनी 46 अर्ज दाखल केले होते. या अर्जांची आज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत छाननी प्रक्रिया पार पडली. नंतर पाच उमेदवारांचे पाच अर्ज अवैध ठरले. यात भाजप- शिवसेना युतीच्या मुख्य उमेदवाराचा अर्ज मंजूर झाल्याने भाजपतर्फे पर्यायी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या डॉ. राहुल सुभाष भामरे यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. त्यांचा अपक्ष म्हणून दाखल केलेला अर्ज मंजूर करण्यात आला. अपक्ष उमेदवार मो. इस्माईल जुम्मन यांचे नाव मतदार यादीतून वगळलेले असल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला. अपक्ष उमेदवार ज्ञानेश्वर तानाजी पाटील यांनी 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र नसल्याने अर्ज अवैध ठरला. अपक्ष रऊफ खान कादीर खान यांचे नाव मतदार यादीतील तपशिलाशी जुळत नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. अपक्ष इम्रान समशेर खान यांच्या उमेदवारी अर्जावर सूचकांच्या स्वाक्षऱ्या नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. 

रिंगणातील उमेदवार असे 
अब्दुल रशीद शेख मेहबूब (अपक्ष), अनिल रामदास जाधव (बळीराजा पार्टी), अनिल उमराव गोटे (लोकसंग्राम), अय्यूब रझाक तलावी (अपक्ष), सुभाष शंकर भामरे (अपक्ष), राहुल सुभाष भामरे (अपक्ष), धीरज प्रकाश चोरडिया (अपक्ष), दिलीप भाईदास पाटील (बहुजन मुक्ती पार्टी), दिनेश पूनमचंद कोळी (अपक्ष), दीपक खंडू अमृतकर (अपक्ष), ज्ञानेश्‍वर बळिराम ढेकळे (अपक्ष), गाझी अहतेझाद अहमद खान (अपक्ष), हुसेन खान मेराजबी (अपक्ष), इक्‍बाल अहमद मोहंमद रउफखान (अपक्ष), इरफान मोहंमद इसाक (अपक्ष), कुणाल रोहिदास पाटील (कॉंग्रेस), मेवाती हीना युसूफभाई (भारतीय किसान पार्टी), मिर्झा ताहीर बेग समद बेग (अपक्ष), मोहंमद इस्माईल अन्सारी (भारतीय मायनॉरिटीज सुरक्षा महासंघ), मोहंमद रिझवान मोहंमद अकबर (अपक्ष), नबी मोहंमद अहमदुल्लाह (वंचित बहुजन आघाडी), नंदकुमार जगन्नाथ चव्हाण (राष्ट्रीय जनसेना पार्टी), नसीम खान रऊफ खान (अपक्ष), नितीन बाबूराव खरे (अपक्ष), पंढरीनाथ चैत्राम मोरे (अपक्ष), पिंजारी जैनुद्दीन हुसेन (बहुजन महा पार्टी), कासीम कमाल हाशीम मोहंमद आझमी (अपक्ष), सलीम कासम पिंजारी (अपक्ष), संजय यशवंत अपरांती (बहुजन समाज पार्टी), सीताराम बागा वाघ (बहुजन रिपब्लिकन सोशॅलिस्ट पार्टी), सुभाष रामराव भामरे (भारतीय जनता पक्ष), ताहेर सत्तार खाटीक (राष्ट्रीय मराठा पार्टी). 

Web Title: marathi news dhule loksabha 5 form riject