धुळे मतदारसंघात साडेअठरा लाखांवर मतदार 

निखिल सूर्यवंशी
सोमवार, 11 मार्च 2019

खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील सरासरी 18 लाख 74 हजार मतदारांच्या हाती उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असेल. धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, बागलाण, अशा सहा विधानसभा मतदारसंघांत सरासरी 1878 मतदान केंद्रे असतील. 

खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील सरासरी 18 लाख 74 हजार मतदारांच्या हाती उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असेल. धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, बागलाण, अशा सहा विधानसभा मतदारसंघांत सरासरी 1878 मतदान केंद्रे असतील. 

विधानसभा मतदारसंघनिहाय बलाबल 
पूर्वी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघाला भाजपने खिंडार पाडले. मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा लाभ भाजपच्या पदरात पडला. सद्यःस्थितीत धुळे शहर व शिंदखेडा विधानसभा मतदारसंघांत भाजप, धुळे ग्रामीण व मालेगाव विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस, मालेगाव बाह्य मतदारसंघात शिवसेना आणि बागलाण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वरचष्मा आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने प्रतिस्पर्धी कॉंग्रेसचा पाडाव करत मतदारसंघात वर्चस्व राखले. 

आव्हान अन्‌ आरोपांचे वार 
सत्ताधारी भाजपने धुळे लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदारांना मंत्रिपद दिल्याने कॉंग्रेसपुढे आधीच आव्हान उभे राहिले आहे. ते मोडीत काढण्याच्या प्रयत्नात निवडणूक जाहीर होण्यापूर्वी गेल्या दीड महिन्यापासून कॉंग्रेसकडून भाजपवर विविध आरोपांचे वार सुरू आहेत. भाजपकडून विद्यमान खासदार तथा संरक्षण राज्यमंत्र्यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याचे मानले जाते, तर कॉंग्रेसमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असून, कुणाच्या गळ्यात ही माळ पडते याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

"एकी'वर भवितव्य अवलंबून 
या निवडणुकीत भाजप- शिवसेनेत युती, तर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आघाडी झाली आहे. भाजपचा पाडाव करण्यासाठी कॉंग्रेस आघाडीत "एकी' दिसत आहे, तर भाजप- शिवसेनेत किती एकवाक्‍यता राहते, यावर युतीच्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून असल्याचे मानले जाते. 

शक्तिपात करण्याचे डावपेच 
मराठा- पाटील, मुस्लिमबहुल असलेल्या धुळे मतदारसंघात मतविभाजनाच्या डावपेचांवर रिंगणातील भाजप व कॉंग्रेसच्या उमेदवाराकडून भर दिला जाऊ शकतो. मुस्लिमबहुल भागात मतविभाजन करून कॉंग्रेस आघाडीची शक्ती क्षीण करण्याचा भाजपचा प्रयत्न, तर दोन्ही पक्षांकडून पाटील समाजाचेच उमेदवार दिले जाणार असल्याने मराठा- पाटील समाजातील मतविभाजनाचा प्रश्‍न निवडणुकीत रंगत निर्माण करणारा ठरू शकेल. शिवाय विधानसभा मतदारसंघनिहाय पक्षीय बलाबल पाहिले तर या स्थितीचा भाजप व कॉंग्रेसच्या उमेदवाराला नेमका किती व कसा लाभ होतो, यावर त्यांच्या उमेदवाराच्या विजयाचे गणित अवलंबून असेल. 

 
निवडणुकीत 2009 मध्ये मिळालेली मते 
प्रताप सोनवणे (भाजप, विजयी)....2,63,260 
अमरिशभाई पटेल (कॉंग्रेस)..........2,43,841 
निहाल अहमद (से. जनता दल)......72,738 

 
निवडणुकीत 2014 मध्ये मिळालेली मते 
डॉ. सुभाष भामरे (भाजप, विजयी).....5,29,450 
अमरिशभाई पटेल (कॉंग्रेस)..............3,98,727 
योगेश ईशी (बहुजन समाज पक्ष)........9,897 
 
धुळे लोकसभा मतदारसंघ ः मतदारांची स्थिती (2019) 
मतदारसंघ............पुरुष..............महिला............इतर........एकूण..............मतदान केंद्रे 
धुळे ग्रामीण..........189350.......174369.......01.......363720.......370 
धुळे शहर.............162374.......145153......13........307540.......249 
शिंदखेडा..............161518.......155440......00........316958.......338 
मालेगाव मध्य........147085.......134371......02.........281458......312 
मालेगाव बाह्य.........175341.......156676.....01.........332018......329 
बागलाण...............142767........129848.....01.........272616......280 
 
एकूण..................9,78,435.......8,95,857....18........18,74,310....1878 
 

Web Title: marathi news dhule loksabha matdar sangh