चंद्रकांत सोनार यांची महापौरपदी बिनविरोध

live photo
live photo

धुळे : भाजपचे नगरसेवक चंद्रकांत सोनार यांची महापौरपदी तर नगरसेविका कल्याणी अंपळकर यांची उपमहापौरपदी आज बिनविरोध निवड झाली.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 74 पैकी 50 जागा जिंकत भाजपने महापालिकेवर सत्ता मिळवली होती. या  विजयानंतर आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार पीठासीन अधिकारी होते, आयुक्त सुधाकर देशमुख उपस्थित होते. महापौर पदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेण्याची घोषणा करत अधिकृतरित्या उमेदवारी मागे घेतली. शहर विकासासाठी जनतेने भाजपला कौल दिला असल्याचे म्हणत उमेदवारी माघार घेत असल्याचे व भाजपला पाठिंबा देत असल्याचे गटनेते कमलेश देवरे यांनी सांगितले
त्यामुळे त्यामुळे भाजपचे चंद्रकांत सोनार यांची महापौरपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
उपमहापौर पदासाठीही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतल्याने भाजपच्या कल्याणी अंपळकर यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.  त्यानंतर भाजपने घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com