esakal | धुळ्याचे विद्यार्थी डॉक्‍टर म्हणतात, आमचे हाल, मागण्यांकडे कोणी लक्ष देईल का?
sakal

बोलून बातमी शोधा

medical collage student

शासकीय महाविद्यालय व जिल्हा सर्वोपचार रुग्णालय व्यवस्थापनापुढे आज कैफियत मांडली. याबाबत गैरसमज न करता न तुमचे पाल्य समजूनच आमचे प्रश्‍न सोडवावे, अशी मागणीही विद्यार्थी डॉक्‍टरांनी रेटून धरली.

धुळ्याचे विद्यार्थी डॉक्‍टर म्हणतात, आमचे हाल, मागण्यांकडे कोणी लक्ष देईल का?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : एकीकडे संसर्गजन्य "कोरोना व्हायरस'शी मुकाबला करावा लागत असताना, त्यासाठी अहोरात्र कर्तव्य बजावत असताना आमच्या हालअपेष्टा, मागण्यांकडे कोण लक्ष देईल? त्या कशा पूर्ण होतील? आमच्या जिवाचे रक्षणकर्ते कोण, अशा भावनात्मक विविध प्रश्‍नांची सरबत्ती करत महाविद्यालयीन विद्यार्थी डॉक्‍टरांनी हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालय व जिल्हा सर्वोपचार रुग्णालय व्यवस्थापनापुढे आज कैफियत मांडली. याबाबत गैरसमज न करता न तुमचे पाल्य समजूनच आमचे प्रश्‍न सोडवावे, अशी मागणीही विद्यार्थी डॉक्‍टरांनी रेटून धरली.

आवर्जून वाचा - अंत्यसंस्कारावेळी बसला आश्‍चर्यचा धक्का...दुसराच निघाला मृतदेह, धुळे रुग्णालयाचा गोंधळी कारभार !

"कोरोना'शी मुकाबला करताना महाविद्यालय व रुग्णालय व्यवस्थापन देत असलेली जबाबदारी विद्यार्थी डॉक्‍टर नेटाने पार पाडत आहेत. अहोरात्र सेवा देताना वैद्यकीय कर्तव्य बजावत आहेत. त्यासाठी व्यवस्थापनाचे पाठबळही मिळत आहे. मात्र, आमचे तीन महिन्यांपासून वेतन थकीत आहे. ते तत्काळ मिळावे. जिल्हा सर्वोपचार रुग्णालय हे केवळ कोव्हिड 19 चे रुग्णालय व्हावे आणि या रुग्णालयातील कोव्हिड 19 चे रुग्ण वगळता इतर आजाराचे रुग्ण हे तातडीने दुसऱ्या रुग्णालयात स्थलांतरित होणे अत्यंत आवश्‍यक आहे. शिवाय आमच्यातील एखाद्या डॉक्‍टरला चुकून या आजाराची लागण झाली, तर त्याच्यासाठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था नसल्याने ती तत्काळ करण्यात यावी. यात आयसीयू, व्हेंटिलेटरसह विविध उपचाराची सुविधा स्वतंत्रपणे निर्माण केली जावी, यासह अन्य काही महत्त्वाच्या मागण्या विद्यार्थी डॉक्‍टरांनी रुग्णालय व्यवस्थापनाकडे सोमवारी संघटित होऊन केल्या. यावर महाविद्यालय व रुग्णालय व्यवस्थापनाने तत्काळ पावले उचलून विद्यार्थी डॉक्‍टरांची निगा राखणे, त्यांच्या मागण्यांची पूर्तता करणे आणि त्यांना सुरक्षितता पुरविणे गरजेचे मानले जात आहे. पीडित विद्यार्थ्यांनी मागण्यांचे निवेदन व्यवस्थापनाला दिले. त्यांच्या मागण्या वस्तुस्थितीदर्शक असल्याचेही व्यवस्थापनाने चर्चेवेळी मान्य केले. या विद्यार्थ्यांकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. या स्थितीमुळे त्यांचे पालकही चिंतेत असून, त्यांना दिलासा देण्याची कार्यवाही रुग्णालय व्यवस्थापनाला तत्काळ करावी लागणार आहे. 

loading image