आमदार गोटेंचे विरोधकांना आव्हान 

कैलास शिंदे
शनिवार, 1 डिसेंबर 2018

ळे ः शहराचे आमदार अनिल गोटे यांनी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकताना शहरातील सामाजिक सुरक्षेवर जोरदार हल्ला चढविला. महापालिकेच्या सत्तेतील विरोधकांशी सामना करीत असताना त्यांनी आपल्याच पक्षातील नेतृत्वालाही आव्हान दिले. त्यामुळे येथील महापालिका निवडणूक राज्याच्या राजकीय पटलावर चर्चेत आली. "लोकसंग्राम'च्या माध्यमातून हा लढा पुकारलेल्या गोटेंच्या उमेदवारांना सांघिक चिन्ह न मिळाल्याने त्यांना पहिला झटका बसला असून, स्वपक्षाचे नेतृत्व, विरोधकांशी सामना करतानाच आता त्यांच्या राजकीय नेतृत्वाचीही कसोटी लागली आहे. 

लोकसंग्रामचे संस्थापक व भाजपचे आमदार अनिल गोटे यांचे राजकीय जीवन संघर्षमय आहे. विविध आंदोलने, मोर्चांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडत ते पुढे आल्याने त्यांनी राजकीय जीवनात अनेक अडचणींवर सहज मात केली. गेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांना जनतेनेही भरघोस मतदान करून यश दिले. मात्र, आता महापालिका निवडणुकीत आपल्याच पक्षाविरुद्ध त्यांनी लढा पुकारला आहे. आमदार गोटे यांच्या या आव्हानामुळे केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपमध्ये निश्‍चित खळबळ उडाली आहे. 

राजकारणाची सखोल जाण 
आंदोलनाच्या मुशीतून राजकीय रणांगणात आलेले आमदार गोटे यांना धुळ्याच्या राजकारणाची सखोल माहिती आहे. महापालिकेत सत्तेत असलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आवाका, तर आपल्याच पक्षाला आव्हान देत असताना मोजावी लागणारी राजकीय किंमत याचीही त्यांना जाण आहे. त्यामुळे संपूर्ण नियोजनानुसार ते रणांगणात उतरले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. "लोकसंग्राम'च्या माध्यमातून त्यांनी उमेदवार मैदानात उतरविले. त्यातून निवडणुकीत त्यांचे मोठे आव्हान निर्माण झाल्याचे चित्र आहे. 

चिन्हाच्या लढाईत झटका 
मात्र, या लढाईच्या पहिल्या टप्प्यातच त्यांना जोरदार झटका बसला आहे. त्यांच्या "लोकसंग्राम'ला सांघिक निवडणूक चिन्ह मिळाले नाही. पक्षाचे 60 उमेदवार रणांगणात असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यापैकी केवळ 11 उमेदवारांनाच "शिटी' चिन्ह मिळाले आहे. त्यातही नऊ उमेदवार अपक्ष गणले गेले असून, हेमा गोटे आणि तेजस गोटे यांनाच लोकसंग्रामतर्फे शिटी चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे आता गोटे यांना उमेदवारांचा सांघिक प्रचार करण्यात अडचणी निर्माण होणार आहेत. याच ठिकाणी त्यांची खरी कसोटी लागणार आहे. 

राजकीय भविष्याची कसोटी 
स्वपक्षीय आणि विरोधकांना आव्हान देत असताना आपल्याच गटातील उमेदवारांच्या चिन्हाचा प्रचार करताना आमदार गोटे यांचे चांगलीच दमछाक होणार आहे. प्रभाग एकमधून पुत्र तेजस गोटे आणि प्रभाग पाचमधून पत्नी हेमा गोटे यांना निवडणूक रणांगणात उतरविल्याने अधिकच चुरस निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे, तर पत्नी हेमा गोटे यांना महापौरपदाच्या उमेदवार म्हणून जाहीर केल्याने याच निवडणुकीच्या यशापयशावर आमदार गोटेंच्या आगामी राजकीय भविष्याचाही वेध ठरणार आहेत. त्यामुळे आमदार गोटे यांची स्वतःचीही कसोटी असणार आहे. 

Web Title: marathi news dhule MLA gote corporation election