धुळे मनपा निवडणुक ः साडेअकरापर्यंत 14 टक्‍के मतदान 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 डिसेंबर 2018

धुळे ः महापालिकेच्या चौथ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज (ता. 9) मतदान प्रक्रिया होत आहे. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार असून, सकाळी साडेअकरापर्यंत एकूण 14.25 टक्‍के इतकेच मतदान झाले आहे. 

धुळे ः महापालिकेच्या चौथ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज (ता. 9) मतदान प्रक्रिया होत आहे. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार असून, सकाळी साडेअकरापर्यंत एकूण 14.25 टक्‍के इतकेच मतदान झाले आहे. 
धुळे महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया राबविली जात असून, शहरातील 19 प्रभागांतील 74 (एक बिनविरोध) जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत महापालिका हद्दीतील तीन लाख 29 हजार मतदार आहेत. मतदानासाठी एकूण साडेचारशे मतदान केंद्रांवर प्रक्रिया राबविली जात असून, सकाळी साडेसात वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरवात झाली आहे. या प्रक्रियेत सकाळी साडेसात ते साडेअकरा या दरम्यान एकूण 14. 28 टक्‍के मतदान झाले आहे. यामध्ये एकूण मतदारांपैकी 47 हजार 55 जणांनी मतदानाचा हक्‍क बजाविला आहे. यामध्ये 26 हजार 486 पुरूष तर 20 हजार 569 महिलांचा समावेश आहे. 

काही ठिकाणी किरकोळ वाद 
धुळे महापालिकेवर कोणाची सत्ता येणार याचे गणित मांडताना मतदान प्रक्रियेला सुरवात झाली. मतदान प्रक्रियेपुर्वी म्हणजे शनिवारी (ता.8) रात्री काही ठिकाणी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांचा वाद झाला होता. त्यांना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले होते. शिवाय आज मतदान प्रक्रियेला सुरवात झाल्यानंतर सकाळी शांततेत प्रक्रिया पार पडली. परंतू, सातपुडा विद्यालयात मतदान यंत्रात अडचणी निर्माण झाल्यासने या केंद्रावर उशिराने मतदान प्रक्रियेला सुरवात झाली. तसेच नऊनंतर काही मतदान केंद्रावर किरकोळ वाद निर्माण झाले होते. हे वाद वगळता सर्वच केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत सुरू आहे. तर प्रभाग क्रमांक 15 मध्ये डमी मतदार सापडल्याची माहिती देखील आहे. 

Web Title: marathi news dhule muncipal corporation election 14 parcant voting