माघारीचा खेळ उद्याच रंगणार 

माघारीचा खेळ उद्याच रंगणार 

धुळे ः महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी प्रक्रियेत आज विविध प्रभागांतील दहा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे अद्यापही तब्बल 456 उमेदवार रिंगणात आहेत, त्यामुळे उमेदवारी माघारीचा हा खेळ शेवटच्या दिवसापर्यंत रंगणार आहे. दरम्यान, आज माघार घेणारे दहापैकी तब्बल सात उमेदवार प्रभाग 18 मधील आहेत. 
महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेत मुदतीत एकूण 737 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीअंती या अर्जांपैकी 466 अर्ज वैध ठरले. उर्वरित 271 अर्ज निवडणुकीच्या प्रक्रियेतून बाहेर पडले होते. या प्रक्रियेनंतर कोणत्या प्रभागातून कोण आपली उमेदवारी मागे घेणार याची उत्सुकता आहे. उमेदवारी अर्ज माघारीची ही प्रक्रिया 26 नोव्हेंबरला दुपारी तीनपर्यंत आहे. या प्रक्रियेत आज विविध प्रभागांमधील दहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्या-त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जाऊन उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्जावर स्वाक्षरी करून ते निवडणूक अधिकाऱ्यांकडे दिले. त्याची पोच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संबंधित उमेदवारांना दिली. उमेदवारी मागे घेणाऱ्यांत दहापैकी तब्बल सात उमेदवार प्रभाग 18 मधील आहेत. त्यातही चार उमेदवार प्रभाग-18 "ड'मधील आहेत. अर्ज मागे घेणारे दहापैकी नऊ उमेदवार अपक्ष आहेत. प्रभाग 18 "अ'मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उज्वला ईश्‍वर पवार यांचाही यात समावेश असला, तरी राष्ट्रवादीतर्फे तेथे ईश्‍वर किसन पवार यांची उमेदवारी कायम आहे. 

आज सुटी, उद्या उडणार झुंबड 
निवडणुकीसाठी 13 ते 20 नोव्हेंबरदरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया होती, तरीही शेवटच्या दिवशी सर्वाधिक अर्ज दाखल झाले. अशीच स्थिती आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेतही असेल अशी शक्‍यता आहे. कारण 466 उमेदवारी अर्जांपैकी आज केवळ दहा इच्छुकांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे अद्यापही 456 उमेदवारी अर्ज रिंगणात आहेत. उद्या (ता. 25) सार्वजनिक सुटी असल्याने उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार नाहीत. त्यामुळे सोमवारी (ता. 26) शेवटच्या दिवशीच अर्ज मागे घेण्यासाठी झुंबड उडण्याची शक्‍यता आहे. 

यांची उमेदवारी मागे 
ऍड. मोनाली विशाल साळवे (प्रभाग 4 अ, अपक्ष), सुनीता विजय मराठे (प्रभाग 11 ब, अपक्ष), जीवन रामचंद्र शेणगे (प्रभाग 14 ब, अपक्ष), उज्ज्वला ईश्‍वर पवार (प्रभाग 18 अ, राष्ट्रवादी), परिणीती किशोर शिंदे (प्रभाग 18 ब, अपक्ष), पुष्पा राजेश पवार (प्रभाग 18 क, अपक्ष), शिवाजी लक्ष्मण वायसे (प्रभाग 18 ड, अपक्ष), अश्‍विनी प्रवीण पवार (प्रभाग 18 ड, अपक्ष), नितीन पुंडलिक गावळे (प्रभाग 18 ड, अपक्ष), वैशाली कुणाल पवार (प्रभाग 18 ड, अपक्ष). 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com