नवापूर- धुळे महामार्गावरील पुल खचला 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

नवापूर ः संततधार पावसामुळे धुळे, नंदुरबार, नवापूर, शहादा परिसरात जनजीवन विस्कळित झाले असून, सर्वत्र पाणी साचले आहे. गेल्या 36 तासांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने नवापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गावरील नवापूरपासून चार किमी अंतरावरील रायंगण (ता.नवापूर) शिवारात पुल कम फरशी तुटली आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक पुर्णपणे बंद झाली आहे. 

धुळे व नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक असल्याने सर्वच नद्यांना पुर आले आहेत. शिवाय, घरांमध्ये देखील पाणी शिरले असल्याने अनेकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने काही भागातील रस्ते देखील खचले असून, नवापूर- धुळे या महामार्ग सहावरील रायंगण गावालगतचा लहान पुल खचला आहे. या खचलेल्या पुलावर ट्रक अडकला असून, वाहतूक पुर्णपणे बंद झाली आहे. याशिवाय शहादा- नंदुरबार रस्त्यावरील लांबोळा (ता. शहादा) गावाजवळ नव्याने बांधकाम सुरूअसलेल्या रस्त्याच्या स्लॅबच्या खालील भराव खचला असून पाण्याच्या प्रवाहामुळे स्लॅबचे तुकडे झाले आहेत. 

धुळे विभागातून एसटी सेवा बंद 
धुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे राज्य परिवहन महामंडळाची बस फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. यात धुळे- नवापूर शहादा, साक्री- नवापूर नाशिक मार्ग बंद, नंदुरबार- अक्‍कलकुवा, सुरत- धडगाव, नाशिक मार्ग बंद, शिरपुर- चोपडा, शिंदखेडा- आमराळे, नवापुर- सुरत, दोंडाईचा- शहादा या मार्गावरील बससेवा बंद करण्यात आली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule navapur brige damage