लष्कराच्या नादुरुस्त हेलिकॉप्टरचे सुरक्षितरित्या टेकऑफ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

धुळे येथील रहिवासी व भारतीय सैन्यदलात सुभेदारपदी असलेले योगेश चव्हाण हे जम्मू-कश्मीरमध्ये १०८ इंजिनिअर रेजिमेंटमध्ये तैनात होते. बांदीपुरा भागात तैनात असताना पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात त्यांना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव काल लष्कराच्या हेलीकॉप्टरद्वारे शिंदखेडा तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी खलाणेमध्ये आणण्यात आले होते.

सटाणा : देशाच्या सीमेवर शत्रूशी लढताना हुतात्मा झालेले भारतीय सैन्यदलातील सुभेदार योगेश भदाणे यांचे पार्थिव काल (ता.१५) रोजी धुळे येथे पोहोचवून परत जात असताना लष्कराचे हेलीकॉप्टर नादुरुस्त झाल्याने अचानक अजमेर सौंदाणे (ता.बागलाण) येथे उतरविण्यात आले. किरकोळ दुरुस्ती झाल्यानंतर हेलीकॉप्टरचे सुरक्षितरीत्या उड्डाण झाले.

धुळे येथील रहिवासी व भारतीय सैन्यदलात सुभेदारपदी असलेले योगेश चव्हाण हे जम्मू-कश्मीरमध्ये १०८ इंजिनिअर रेजिमेंटमध्ये तैनात होते. बांदीपुरा भागात तैनात असताना पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात त्यांना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव काल लष्कराच्या हेलीकॉप्टरद्वारे शिंदखेडा तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी खलाणेमध्ये आणण्यात आले होते. यानंतर पायलट व लष्कराचे जवान हेलीकॉप्टर घेऊन परतीला निघाले. मात्र हेलीकॉप्टरमध्ये काही बिघाड झाल्याचे पायलटच्या निदर्शनास आले. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बागलाण तालुक्याच्या हद्दीत येताच पायलटने हेलीकॉप्टर अजमेर सौंदाणे गावालगत उतरविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश येत नव्हते. अखेर त्यांनी गावाबाहेरील मोकळ्या जागेवर हेलीकॉप्टर उतरविले. मात्र अचानक गावात हे लष्कराचे हेलीकॉप्टर आले कुठून, या कुतुहलापोटी सायंकाळी शेती कामावरून परतलेल्या गावातील आबालवृद्ध ग्रामस्थांनी हेलीकॉप्टर उतरल्याच्या जागेकडे धाव घेतली. दरम्यान, हेलीकॉप्टरच्या दरवाजाचे नट बोल्ट निखळल्याने दरवाजा व्यवस्थित लागत नव्हता त्यामुळे हा बिघाड झाला होता. त्यामुळे पायलट व जवानांनी स्वतःच त्याची दुरुस्ती केली व दरवाजाला दोरीने बांधून पुन्हा यशस्वीरीत्या उड्डाण केले.

सुमार दर्जाच्या व जुनाट हेलीकॉप्टरचे सध्या अनेक ठिकाणी अपघात घडत आहेत. आज पायलट व लष्करी जवानांच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळल्याने तालुक्यात एकच चर्चेचा विषय ठरला.

Web Title: Marathi news Dhule news army helicopter take off