१९ व्या ग्रामीण साहित्य संमेलनाध्यक्षपदी रामदास वाघ

जगन्नाथ पाटील
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

इगतपुरी तालुका साहित्य मंडळाने १९९९ ते २०१७ या कालावधीत विविध विभागात १८ एकदिवसीय साहित्य संमेलनांचे यशस्वी आयोजन केले आहे. यावर्षीचे १९ वे संमेलन शनिवार दि.२४ फेब्रूवारी २०१८ रोजी जि. प. शाळा वाडीव-हे (ता. इगतपुरी) येथे आयोजित करण्यात आले आहे.

धुळे : कापडणे (ता.धुळे) येथील व जेष्ठ साहित्यिक रामदास वाघ यांची इगतपुरी (जि.नाशिक) तालुका साहित्य मंडळाच्या १९व्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी  निवड करण्यात आली आहे ; अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष व साहित्यिक पुंजाजी मालुंजकर यांनी दिली.

इगतपुरी तालुका साहित्य मंडळाने १९९९ ते २०१७ या कालावधीत विविध विभागात १८ एकदिवसीय साहित्य संमेलनांचे यशस्वी आयोजन केले आहे. यावर्षीचे १९ वे संमेलन शनिवार दि.२४ फेब्रूवारी २०१८ रोजी जि. प. शाळा वाडीव-हे (ता. इगतपुरी) येथे आयोजित करण्यात आले आहे.

ज्येष्ठ साहित्यिक रामदास वाघ यांची ‘कष्टाची भाकर ‘या काव्यसंग्रहासह अहिराणी भाषेतील बारा पुस्तके प्रकाशित असून ग्रामीण राजकारणावर 'सरपंच' कादंबरी, 'ओवी अनुभवावी अहिराणी', 'सूर्याचा गोळा' कवितासंग्रह तसेच 'छान माझी बाहुली' हा बालकाव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्यांच्या अहिराणीतील बारा पुस्तकांची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झालेली असून त्यांनी याआगोदर पुणे व नाशिक येथील अहिराणी साहित्य संमेलनांचे अध्यक्षपदही भूषविलेले आहे.

हे साहित्य संमेलन सकाळी ९ ते ५ या वेळेत ३ सत्रांत संपन्न होणार आहे.या एकदिवसीय साहित्य संमेलनात सर्व साहित्यिक,सहित्यप्रेमीनी सहभागी होण्याचे आवाहन मंडळाचे सचिव अँड़ रतनकुमार इचम, ग्रंथमित्र बाळासाहेब पलटने, अँड़ ज्ञानेश्वर गुळवे, दत्तात्रय झनकर, हिरामण शिंदे यांनी केले आहे.

दरम्यान साहित्यिक वाघ यांच्या निवडीबद्दल मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, रंजन खरोटे, जगतराव सोनवणे, डी.बी.जगत्पुरीया, माजी आमदार शरद पाटील आदींसह धुळे जिल्ह्यातील साहित्यिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. कापडणेत फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला.

Web Title: Marathi news Dhule news gramin sahitya sammelan