पर्यटनमंत्र्यांच्या फिर्यादीनंतर नवाब मलिकांवर मानहानीचा गुन्हा 

निखिल सूर्यवंशी
मंगळवार, 30 जानेवारी 2018

राजकारणाची वेळ नाही : मंत्री रावल 

मंत्री रावल म्हणाले, की पीडित पाटील कुटुंबाला न्याय देण्याला प्रथम प्राधान्य दिले जावे. त्यांना धीर देणे महत्त्वाचे आहे. शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूचे राजकारण करण्याची ही वेळ नाही. या संदर्भात होत असलेले आरोप बिनबुडाचे आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी माझ्यासंदर्भात बेजबाबदारपणे केलेल्या आरोपांविरोधात दोंडाईचा न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करत आहे. त्यांना योग्य वेळी उत्तर देईन. दोंडाईचा येथील माजी कामगार राज्यमंत्री व कॉंग्रेसचे नेते डॉ. हेमंत देशमुख यांनी दिलेल्या माहितीवरूनच नवाब मलिक यांनी बेछूट, निराधार आरोप केल्याचे मंत्री रावल यांनी नमूद केले. 

धुळे : मंत्रालयात 23 जानेवारीला विष प्राशनातून आत्महत्येचा प्रयत्न करणारे प्रकल्पग्रस्त शेतकरी धर्मा मंगा पाटील (वय 80, रा. विखरण, ता. शिंदखेडा) यांचा रविवारी (ता. 28) रात्री साडेनऊला मुंबईतील जे. जे. रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेचा राजकीय "इश्‍यू' झाला असून सत्ताधारी भाजप आणि कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अशात रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर आज (मंगळवारी) दोंडाईचा पोलिस ठाण्यात बदनामी, मानहानीबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल केला. 

Dharma Patil

शेतकरी धर्मा पाटील यांच्यावर विखरण येथे आज सकाळी साडेदहानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाल्यानंतर मंत्री रावल यांनी ही पावले उचलली. 

राजकारणाची वेळ नाही : मंत्री रावल 
मंत्री रावल म्हणाले, की पीडित पाटील कुटुंबाला न्याय देण्याला प्रथम प्राधान्य दिले जावे. त्यांना धीर देणे महत्त्वाचे आहे. शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूचे राजकारण करण्याची ही वेळ नाही. या संदर्भात होत असलेले आरोप बिनबुडाचे आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी माझ्यासंदर्भात बेजबाबदारपणे केलेल्या आरोपांविरोधात दोंडाईचा न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करत आहे. त्यांना योग्य वेळी उत्तर देईन. दोंडाईचा येथील माजी कामगार राज्यमंत्री व कॉंग्रेसचे नेते डॉ. हेमंत देशमुख यांनी दिलेल्या माहितीवरूनच नवाब मलिक यांनी बेछूट, निराधार आरोप केल्याचे मंत्री रावल यांनी नमूद केले. 

Jaykumar rawal

मलिक- रावलांमधील वाद 
मंत्री रावल यांची औष्णिक वीज प्रकल्पांतर्गत चार एकर जागा असून त्यांना जमिनी लाटून मोबदला उकळण्याची सवय आहे, अशा आशयाचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मात्र, शिंदखेडा मतदारसंघात विरोधी गटाचा आमदार असताना आंदोलनात सहभागी होता येत नसल्याने शेतकरी शंकरसिंह गिरासे यांनी त्यांची शेती माझ्या नावावर केली. भूसंपादनाची अधिसूचना निघण्यापूर्वी मला खातेदार बनविले. नंतर बाधित शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळावा म्हणून तत्कालीन कॉंग्रेस आघाडी सरकारशी लढा सुरू केल्याची भूमिका मंत्री रावल यांनी मांडली आहे. याच मुद्यावरून फिर्यादी होत मंत्री रावल यांनी दोंडाईचा पोलिस ठाण्यात मंगळवारी दुपारी एकनंतर नवाब मलिक यांच्यावर मानहानी, बदनामीसंदर्भात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. तो तरतुदीनुसार पुढील कार्यवाहीसाठी दोंडाईचा न्यायालयाकडे सोपविला जाईल. 

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: Marathi news Dhule news Jaikumar Raval and Nawab Malik clash on Dharma Patil death