विद्यार्थ्यांनी जखमी चिमणीला केले उडण्यास समर्थ; घडविले भूतदयेचे दर्शन

जगन्नाथ पाटील
शनिवार, 1 जुलै 2017

शालेय अभ्यासक्रमात शिकविण्यात येणाऱ्या नैतिक मूल्यांचा प्रत्यक्ष व्यवहारात वापर करण्याचे आदर्श उदाहरण येथील शालेय विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. विद्यार्थ्यांनी जखमी चिमणीला घरी नेऊन उपचार करून उडण्यास समर्थ केले आहे.

कापडणे (जि. धुळे) : शालेय अभ्यासक्रमात शिकविण्यात येणाऱ्या नैतिक मूल्यांचा प्रत्यक्ष व्यवहारात वापर करण्याचे आदर्श उदाहरण येथील शालेय विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. विद्यार्थ्यांनी जखमी चिमणीला घरी नेऊन उपचार करून उडण्यास समर्थ केले आहे.

धुळे जिल्ह्यातील कापडणे येथील एच.एस. बोरसे विद्यालयातील प्रथमेश पाटील, अनिल वळवी, मोहन भील, वैभव पाटील व निकेश भील हे सातवीच्या वर्गातील पाच विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर घरी जात होते. घराच्या रस्त्यात त्यांना दोन चिमण्या रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळल्या. त्यापैकी एक चिमणी गतप्राण झाली होती. मात्र जिवंत अवस्थेतील जखमी चिमणीला विद्यार्थ्यांनी हातात घेतले आणि अगदी व्यवस्थितपणे प्रथमेशच्या घरी आणले. त्यानंतर तिच्या जखमी भागांवर हळद लावली. तिला खायला दाणे टाकले. दोन-तीन दिवस तिची काळजी घेतली. दरम्यान तीन दिवसांत ती बरी झाली आणि उडण्यास समर्थ झाली. हे पाहून लळा लागलेला असतानाही पाचही मित्रांनी तिला आकाशात सोडून दिले. हा सर्व प्रकार शाळेचे मुख्याध्यापक आर. ए. पाटील यांना समजला. त्यांनी परिपाठाच्या तासाला पाचही जणांचे कौतुक केले.

■ 'ई सकाळ'वरील ताज्या बातम्या
शेतकरी विधवा महिलांनी काढली मुख्यमंत्र्यांची अंत्ययात्रा
पुण्यातील सिंगल स्क्रिन चित्रपटगृहे बंद; जीएसटीमुळे चित्रपटगृहचालक संभ्रमावस्थेत
मारुतीच्या मोटारी 3 टक्क्यांनी स्वस्त
गायीच्या नावे कायदा हातात घेऊ नका : योगी आदित्यनाथ
मेस्सी बालपणीच्या मैत्रिणीसोबत विवाहबंधनात
अनंतनाग: सुरक्षारक्षक व दहशतवाद्यांमध्ये चकमक
मोदींकडे दूरदृष्टीचा अभाव असल्याचे दिसते: दिग्विजयसिंह
'जीएसटी': सामान्य माणसास अल्पकाळ बोचणारा!
धुळ्यातील शेतकऱ्यांनी कमी खर्चात तयार केले मोटरसायकलचे कोळपे
धुळे जिल्ह्यात भावी शिक्षकांची 'डीएड'कडे पाठ; अध्यापक विद्यालयांच्या वाट्याला वनवास
औरंगाबाद : पत्रकारावरील लाठीचार्जबाबत हरिभाऊ बागडे यांना निवेदन

Web Title: marathi news dhule news kapadne news sakal news school students

टॅग्स